Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दुहेरी खूनप्रकरणातील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष

Goa Pernem Police: पेडणे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: धारगळ येथील रेजिनाल्ड व जॉयसी कुतिन्हो या जोडप्याच्या दुहेरी खूनप्रकरणातील अनिल झाटे, राजेश वीर व अनंत वीर या तिघा आरोपींना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले. पोलिसांनी या खूनप्रकरणी सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरवण्याइतपत पुरेसे नाहीत. सरकारी वकील या आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

धारगळ येथे राहत असलेल्या कुतिन्हो जोडप्याच्या घरी १६ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आरोपी घुसले. त्यांच्याकडे कोयता व चॉपर होता. त्यांनी या जोडप्याच्या शरीरावर तसेच डोक्यावर या तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात हे जोडपे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

आरोपींनी जाताना जॉयसी हिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले होते. न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयातील खटल्यावरील २१ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. मात्र, त्यातून आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्यास पोलिस अपयशी ठरले.

सुडापोटी हल्ला

आरोपी अनिल झाटे हा जॉयसी कुतिन्हो हिच्याकडे तिच्या फार्महाऊसमध्ये कामाला होता व या फार्महाऊसमध्येच तो कुटुंबासोबत राहत होता. जॉयसी हिच्या घरातील दागिने चोरीला गेल्याने तिने अनिल झाटे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. पेडणे पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत ठेवले होते. त्यामुळे अनिल झाटे याला या प्रकरणाचा राग होता. त्यामुळे हा सूड उगवण्यासाठी त्याने सोबत इतर दोघांना घेऊन जॉयसी कुतिन्हो हिच्या घरी जाऊन जोडप्याचा खून केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

FIFA World Cup 2026: कतारच्या खेळाडूचं 'ते' घातक टॅकल अन् कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू मैदानावरच कोसळला; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT