Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या निवडणूक, सभेला न्यायालयाची स्थगिती

Bhandari Community Election: समाजाचे सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी २७ जुलै २०२४ रोजी जाहीर नोटीस देत ही सभा बोलावली होती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमंतक भंडारी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ ऑगस्ट रोजी घेण्यास कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या समाजाचे सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी २७ जुलै २०२४ रोजी जाहीर नोटीस देत ही सभा बोलावली होती. त्याचवेळी समाजाची नवीन केंद्रीय कार्यकारिणी समिती निवडण्यासाठीचाही कार्यक्रम जाहीर केला होता.

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि सरचिटणीस फक्रू पणजीकर यांनी या नोटिशीला न्यायालयात आव्हान दिले होते. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत अशोक नाईक यांच्या गटाचे एक सदस्य वगळता सर्व सदस्य निवडून आले होते.

विरोधी गटाचे केवळ उपेंद्र गावकर निवडून आले होते. त्यानंतर समितीचा कार्यकाळ संपल्यावर अशोक नाईक गटाने समितीला ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या सभेत मुदतवाढ मिळवली होती. त्याला उपेंद्र गावकर गटाचा आक्षेप होता. त्यामुळे समितीची मुदत संपल्याचा दावा करून ही आमसभा गावकर यांनी बोलावली होती.

२०२० मध्ये उपेंद्र गावकर यांना गोमंतक भंडारी समाजाच्या समितीतून काढून टाकण्यात आले आहे. ते सलग तीनवेळा बैठकांना उपस्थित न राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भात १९ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावून त्यांना माहिती देण्यात आली होती.

१ मे २०२४ रोजी झालेल्या समाजाच्या समितीच्या बैठकीत निवडणूक घेण्याचा निर्णय झालेला होता. या माहितीला गोमंतक भंडारी समाजाने दुजोरा दिला आहे.

उपेंद्र गावकर यांनी दावा केला होता की, समाजाच्या कार्यकारिणीतून काढून टाकल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे मी अजूनही सरचिटणीस आहे. समाजाने मला काढून टाकण्याची केलेली प्रक्रिया बेकायदेशीर आहे.

अर्जदाराला अंतरिम स्थगिती देऊ नये, कारण या समितीला ऑगस्ट २०२१ मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत ऑगस्ट २०२४ मध्ये संपत आहे. समितीचा सरचिटणीस या नात्याने जाहीर नोटीस देऊन सर्वसाधारण वार्षिक सभा तसेच केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

गोमंतक भंडारी समाजाच्या सदस्यांमध्ये फूट दिसून येत आहे. त्यामुळे काही सदस्यांना ही बैठक व निवडणूक घेण्यास परवानगी दिल्यास समाजाचा उद्देशच निष्फळ ठरू शकतो. त्यांच्यातील मतभेद कायदेशीरपणे समाजाच्या समितीची बैठक बोलावून सोडविणे शक्य आहे. त्यामुळे समाजाला न्याय देण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घेऊन ही स्थगिती देण्यात येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT