Mayem  Dainik Gomantak
गोवा

Mayem News : मयेतील खनिज वाहतुकीची कोर्टाने स्वेच्छादखल घ्यावी :‘गोवा फॉरवर्ड’

Mayem News : गावातून अवैध वाहतूक होऊ देणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News : पणजी, मयेतून होत असलेली खनिज वाहतूक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहे. लोकांचा जीव धोक्यात घालून गावातील रस्त्यांवरून अशी अवैध खनिज वाहतूक आम्ही होऊ देणार नाही. न्यायालयाने या अवैध खनिज वाहतुकीची स्वेच्छा दखल घ्यावी.

अन्यथा ही वाहतूक बंद करण्यासाठी आम्ही कायदा हाती घेऊ, असा इशारा मये ग्रामस्थांनी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते संतोष सावंत यांनी दिला.

बुधवारी संतोष सावंत, बबन नाईक, आपा साळगावकर यांनी येथील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. संतोष सावंत म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खनिज वाहतूक पर्यायी मार्गाने होणे गरजेचे आहे.

परंतु ही वाहतूक लोकांचा जीव धोक्यात घालून गावातील अरुंद रस्त्यावरून जात आहेत. गोवा फॉरवर्ड पक्ष खाणकामाच्या विरोधात नाही, परंतु गावातून वाहतूक करण्यास विरोध आहे, असे सावंत म्हणाले.

...तर सरकारच जबाबदार !

यानंतर मये ग्रामस्थ बबन नाईक व संतोष सावंत यांनी बेकायदा खनिज वाहतूक सुरू राहिल्यास तसेच कुणाचा अपघातात मृत्यू झाल्यास मये येथे जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.

खनिज वाहतुकीमुळे जर कुणाचा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT