Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: अमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलीस यशस्वी; दोन युगांडन विद्यार्थांचा जामीन फेटाळला

Mapusa Crime News: युगांडाहून आलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध ठोस पुरावे आढळल्यामुळे न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे

Akshata Chhatre

Mapusa, Goa

म्हापसा: म्हापसा पोलिसांनी युगांडाहून आलेल्या दोन विद्यार्थ्यांकडून जवळपास २० लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते आणि आता या दोघांविरुद्ध ठोस पुरावे आढळल्यामुळे न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांनी दिला.

ऑगस्ट महिन्यात सेंतामू एल्वीज आणि उमर लुक्वागो हे दोन युगांडाचे विद्यार्थी गोव्यात कोकेन घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती.

म्हापसा पोलिसाचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, बाबलो परब, आदित्य गाड, मंगेश पाळणी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी १६ ऑगस्ट रोजी म्हापसा बस स्थानकावर छापा टाकला आणि सेंतामू एल्वीज याच्याकडून १०३ ग्रॅम कोकेन तर उमर लुक्वागो याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

विद्यार्थ्यांजवळ अमली पदार्थ आढळल्यामुळे त्यांना अमली पदार्थ विरोधी कायद्या कलम २१(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. दोन्ही विद्यार्थ्यांकडून सुरु असलेला हा अमली पदार्थांचा व्यवहार आंतराष्ट्रीय बाजारात २०.५ लाखांच्या घरात जाणारा होता.

अटकेनंतर दोन्ही परदेशी विद्यार्थ्यांकडून त्यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्याचा दावा करण्यात आला मात्र यावर झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे सकारात्मक असल्याचे आढळल्याने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सेंतामू एल्वीज आणि उमर लुक्वागो यांचा जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT