Oxygen Crisis of goa
Oxygen Crisis of goa 
गोवा

COVID19 Goa: गोव्यातील प्राणवायू-खाटा तुटवड्यावर पडदा    

दैनिक गोमंतक

पणजी: गोमेकॉ इस्पितळातील कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठ्यात तसेच खाटांच्या तुटवड्याचा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या हस्तक्षेपानंतर सुरळीत झाला असला तरी आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आवश्‍यक ती तयारी ठेवण्याचा तोंडी कानमंत्र आज सरकारला दिला. प्राणवायू फ्लोमीटर, ऑक्सिमीटर तसेच काही औषधे उपलब्ध केली जातील, असे आश्‍वासन सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज खंडपीठाला दिले.( Court hearing on Goa oxygen crisis)

गोमेकॉ इस्पितळात रात्री 2 ते पहाटे 6 या दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांचा प्राणवायू तुटवड्यामुळे मृत्यू होत असल्याचे उघडकीस आल्यावर जनहित याचिकांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने इस्पितळ व्यवस्थापनाचा गेले काही दिवस सुनावणीवेळी पूर्णपंचनामा करत सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत ही यंत्रणा गतिमान होऊन प्राणवायू पुरवठ्याची स्थिती पूर्वपदावर आली. गोमेकॉ इस्पितळातील कोविड रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठा टाकी राज्यात चक्रीवादळ येण्यापूर्वी बसवून प्राणवायू पुरवठा सुरू केल्याबद्दल गोवा खंडपीठाने सरकारची स्तुतीही केली. ही टाकी गेल्या शुक्रवारी (14मे) बसविली नसती, तर मोठा अनर्थही घडला असता, असे तोंडी निरीक्षणही नोंदविले.

आज सुनावणीवेळी गोवा खंडपीठात याचिकादारांनी गोमेकॉ इस्पितळातील खाटा व प्राणवायू पुरवठ्यासंदर्भातच्या स्थितीत कमालीची सुधारणा झाली असून समस्या सुटली असल्याची बाजू मांडली. मात्र, अजूनही इस्पितळातील काही वॉर्डामध्ये प्राणवायू फ्लो मीटर, ऑक्सिमीटर तसेच ‘टार्गोसिड’ औषधांचा तुटवडा असल्याची माहिती दिली. अशा लहानसहान गोष्टींबाबत गोवा खंडपीठ निर्देश देऊ शकत नाही, पण सूचना करील.

सुरस्पेशॅलिटी इस्पितळात गोमेकॉमधील काही चिंताजनक स्थिती असलेल्या रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले आहे व तेथे पाईपमधून प्राणवायू पुरवठा होत असल्याने तेथे प्राणवायूची समस्या नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व इस्पितळांना प्राणवायूसंदर्भात ‘बझर झोन’ ठेवण्याची सक्ती केली आहे हे खंडपीठाने सरकारच्या निदर्शनास आणून दिले. गोमेकॉ इस्पितळातील कोविड वॉर्ड तसेच इतर इस्पितळांना प्रभावी प्राणवायू पुरवठा करून लोकांचे जीव वाचविणे याला प्राधान्य असेल असे निरीक्षण आज खंडपीठाने सुनावणीवेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT