Court | Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

एमपीए मैदानप्रश्‍नी याचिकेवर सुनावणीला न्यायालयाची मंजुरी

सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को - बायणा येथील मुरगाव पत्तन प्राधिकरणाचा (एमपीए) मैदानावरील क्रीडा अकादमीत वास्तव्य करून राहत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना(सीआयएसएफ) तेथून अन्यत्र स्थलांतरीत करावे. यासाठी आपण ‘एमपीए’ विरोधात गोवा खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनवणीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांनी दिली.

दरम्यान, एमपीए मैदान गोवा किक्रेट संघटनेला भाडेपट्टीवर दिल्यास सामान्य क्रीडापटूंसाठीही उपलब्ध करावे, अशी मागणी मुरगाव तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी केली आहे.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीए मैदान गोवा किक्रेट संघटनेला भाडेपट्टीवर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, एमपीएचे मैदान गोवा किक्रेट संघटनेला दिल्यास ते सर्वसामान्य क्रीडापटूंसाठी उपलब्ध होईल का, याचा खुलासा आमदारांनी करावा.

आमोणकर यांनी मैदानासाठी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागतच करतो, पण त्यांनी ‘एमपीए’शी मैदानासाठी 'सामंजस्य करार' करावा, असे आवाहन नझीर खान यांनी केले आहे.

‘साग’ने मैदान ताब्यात घ्यावे !

एमपीए मैदान गोवा क्रिक्रेट संघटनेला भाडेपट्टीवर दिल्यास हे मैदान सामान्य क्रीडाप्रेमीना कायमस्वरूपी बंद होईल. त्यामुळे गोवा क्रीडा प्राधिकरण( ‘साग’)ने पुढाकार घेऊन हे मैदान ताब्यात घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक यांनी केली आहे.

जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या आमदारांनी सर्वप्रथम एमपीएशी सामंजस्य करार करावा. नंतरच गोवा किक्रेट संघटनेच्या बाजूने बोलावे, असे आवाहन जयेश शेटगांवकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT