Fraud Case In Goa Dainik Gomantak
गोवा

Fraud Case In Goa: कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबलीला' गोव्यात अटक

याप्रकरणी आरोपी अंकुश कदम व त्याची पत्नी पूजा कदम यांना गुन्हा शाखेने अटक केली असुन; त्यांच्याकडून 14 मोबाईल व 1.70 लाख रोकड जप्त करण्यात आलेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, कमिशनवर तब्बल 1 ते 10 कोटी पर्यंत कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी अंकुश कदम व त्याची पत्नी पूजा कदम यांना गुन्हा शाखेने अटक केली असुन; त्यांच्याकडून 14 मोबाईल व 1.70 लाख रोकड जप्त करण्यात आलेली आहे.

(Fraud Case In Goa)

राज्यात फसवणुकीचे सत्र चालुच आहे, यातच पर्यटकांनी गोव्यात (Goa) राहण्यासाठी ऑनलाईन बुक (Online Booking) केलेल्या हॉटेल भाड्याच्या पैशांवर सायबर चोरटे डल्ला मारत असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ऑनलाईन व्यवहारात त्रयस्थ व्यक्ती घुसल्याने पर्यटकांना (Tourist) मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. बुक केलेल्या हॉटेलचे व्यवस्थापन देखील यापासून अनभिज्ञ राहत आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

सायबर चोरट्यांचा पर्यटकांच्या पैशांवर डल्ला

कांदोळी परिसरातील एका आंतरराष्ट्रीय हॉटेल मध्ये देखील अशीच घटना घडल्याचे ऑगस्ट महिन्यात समोर आले. हॉटेल बुक केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये संपर्क साधला असता असे कोणतेही बुकिंग झाले नसल्याचे हॉटेल व्यवस्थानाने सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मागील पाच महिन्यात गोव्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये गोव्यात हॉटेल शोधात असलेल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घातला आहे.

गुगलवरील माहिती केली जाते एडिट

गोव्यातील जवळपास सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती आणि संपर्क क्रमांक गुगवर उपलब्ध आहे. सायबर चोरटे संबधित हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती एडिट करण्यासाठी गुगलकडे परवानगी मागतात. गुगल ही माहिती मेलद्वारे संबधित हॉटेल्स, रेस्टॉरंटला कळवते. पण, हॉटेल्स, रेस्टॉरंट मालक गुगलकडून येणारे अशा मेल्सकडे दुर्लेक्ष करतात. त्यानंतर येणारा OTP सायबर चोरटे स्वत: हॉटेल्स, रेस्टॉरंटला फोन करून गुगलमधून बोलत असल्याचे सांगून घेतात.

गुगलचा अॅक्सेस मिळाल्यानंतर चोरटे गुगलवरील हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती संपादित करतात. आणि स्वत:चे नंबर तिथे टाकतात. पर्यटक जेव्हा या नंबरवरती संपर्क करतात तेव्हा हे चोरटे त्यांच्याकडून बुकिंग आणि पैसे घेऊन फसवणूक करतात.

अनेक पर्यटकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात जवळपास 22 लाख रूपयांची फसवणूक झाली असून, अजून हा आकडा वाढू शकतो. याप्रकरणी गोवा सायबर पोलिसांत (Goa Cyber Police) तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar History: आंदोलनांचं केंद्र बनलेलं 'जंतर-मंतर' नेमकं काय आहे? ऐतिहासिक वारसा ते राजकीय आखाडा; जाणून घ्या रंजक इतिहास

Shivrajyabhishek Sohala: 6 जून 1674... जेव्हा सह्याद्रीच्या कुशीत स्वाभिमानाचा यज्ञ पेटला; हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास

Trigrahi Yog: बुद्धी, वैभव अन् भाग्याचा महासंयोग! आकाशात ग्रहांची सर्वात मोठी युती; 22 जूनपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ

Jantar Mantar Agitation: 15 वर्षांनंतर जंतरमंतरवर पुन्हा 'अण्णा हजारें' सारखं आंदोलन? इंटरनेटवरून जन्माला आलेली 'ती' पार्टी आज रस्त्यावर!

पावसाळ्यातील आरोग्य

SCROLL FOR NEXT