CM Pramod Sawant Shiv Shaurya Yatra Dainik Gomantak
गोवा

Shiv Shaurya Yatra : देव, धर्म टिकला तरच देश सुरक्षित : मुख्यमंत्री

गोव्यातील जनतेसाठी छत्रपती शिवराय हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiv Shaurya Yatra : डिचोली, देव आणि धर्म टिकला, तरच देश सुरक्षित राहणार आहे. शिवरायांमुळेच हिंदू संस्कृती टिकली. स्वराज्यातून सुराज्य स्थापन करायचे असल्यास प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि विचार आचरणात आणायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

शिवशौर्य यात्रेचे गुरुवारी सायंकाळी डिचोलीत आगमन झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री तमाम शिवप्रेमीना संबोधित करताना करीत होते. गोव्यातील जनतेसाठी छत्रपती शिवराय हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाबद्धलही द्वेष बाळगला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगून, राज्यभभर शासकीय पातळीवरील शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, विश्व हिंदू परिषदचे प्रदेश मंत्री मोहन आमशेकर, प्रांताध्यक्ष भुवनजी सालेकर, संजय नाईक आदींचा समावेश होता.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांचे विचार आचरणात आणावेत. असे आवाहन केले. भुवनजी सालेकर यांनी विश्व हिंदू परिषदेचा संकल्प सांगून, देश वाचविण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे. असे आवाहन केले.

मोहन आमशेकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शिवशौर्य यात्रा आयोजन करण्यामागील हेतू सांगून देशासमोरील संकटे नमूद केली.

भव्य स्वागत

शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्याबद्धल विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलतर्फे राज्यव्यापी शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीमार्गे आलेली ही शिवशौर्य यात्रा आज (गुरुवारी) सायंकाळी डिचोली पोलिस ठाण्याजवळ येताच, त्याठिकाणी जमलेल्या शेकडो शिवप्रेमीनी शिवशौर्य यात्रेचे स्वागत केले.

नंतर दिंडीच्या तालावर यात्रा डिचोलीतील श्री शांतादुर्गा विद्यालयाजवळ येताच त्याठिकाणी जाहीर सभा झाली.

छत्रपती शिवरायांचा जयघोष : शिवशौर्य यात्रेचे डिचोलीत आगमन होताच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली डिचोली नगरी शिवमय झाली होती. ''जय भवानी, जय शिवाजी'', छत्रपती शिवाजी महाराज की जय'' आदी घोषणानी शहर दुमदुमून गेले होते.

शिव संस्कृती प्रतिष्ठानने सादर केलेले ढोल-ताशे वादन तर या शिवशौर्य यात्रेचे आकर्षण ठरले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बुमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूवर पांड्या फिदा; जेमिसनला बोल्ड केल्यावर काय घडलं? सोशल मीडियावर हार्दिकचा हटके अंदाज व्हायरल!

शौर्याला सलाम!! गोव्याच्या दोन सुपुत्रांना सर्वोच्च 'परम विशिष्ट सेवा पदक'; 77व्या प्रजासत्ताक दिनी गोमंतकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

Mollem: "आम्हाला मनःस्ताप सहन करावा लागतोय"! मोले ग्रामस्थ ‘पार्सेकर फुड्स’विरुद्ध आक्रमक; बंदीची केली मागणी

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल पाहिजेच कशाला'? Social Media वर रंगली चर्चा; चिंबलवासियांच्या लढ्यावरती नेटकरी झाले व्यक्त

गोमंतकीय रंगभूमीवरील कलाकारांचा सार्थ अभिमान! वर्षा उसगावकरांचे प्रतिपादन; वळवईत ललितप्रभा नाट्य मंडळाची 105 वर्षपूर्ती

SCROLL FOR NEXT