Sacorda Dharbandora 
गोवा

Dharbandora: क्रूर आणि अमानुष! गावठी बॉम्बच्या स्फोटात साकोर्डा धारबांदोडा येथे रानडुक्कराचे तोंड फुटले

Pramod Yadav

Sacorda Dharbandora: शिकारीसाठी पेरुन ठेवलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटामुळे साकोर्डा धारबांदोडा येथे तोंड फुटून रानडुक्कर जखमी झाले. जखमी अवस्थेत ओहळावर पाणी पिण्यास आलेल्या रानडुक्कराला पाणीही पिता आले नाही. सध्या या जखमी रानडुक्कराचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, प्राणीप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.

पर्यावरण अभ्यासक रमेश झर्मेकर यांनी या जखमी रानडुक्कराचा फोटो टिपला आहे. "फारच दु:खद आणि दुर्दैवी..." अशा शब्दात रमेश झर्मेकर यांनी या फोटोचे वर्णन केले आहे.

शिकारीसाठी वापरण्यात येणारा गावठी बॉम्ब पेरून ठेवलेल्या ठिकाणी आलेल्या या रानटी डुक्कराने काहीतरी खाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या तोंडातच बॉम्बचा स्फोट झाला. या रानटी डुक्कर गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत डुक्कर पाणी पिण्यासाठी गेले असता त्याला पाणी देखील पिता आले नाही.

जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी पश्चिम घाटात गावठी बॉम्बचा सर्रास वापर केला जातो.

केरळमध्ये गरोदर हत्तीनीचा झाला होता मृत्यू

दोन वर्षापूर्वी केरळमध्ये एक घटना उघडकीस आली होती यात 15 वर्षीय हत्तीने बॉम्ब खाल्याने त्याचा तोंडातच स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर हत्तीन बराचकाळ पाण्यात उभी होती. पण, कालांतराने हत्तीनीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT