Hotal Furtado Dainik Gomantak
गोवा

'फुर्तादो हॉटेल पाडण्याचा लाखोंचा खर्च मालकाकडूनच वसूल करावा'

कोलवा सिव्हिक फोरमची मागणी; उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माफी मागे घेण्याचाही सल्ला

दैनिक गोमन्तक

मडगाव : सीआरझेड कायद्याचा भंग करून सेर्णाभाटी कोलवा येथे बांधण्यात आलेले फुर्तादोज हे बेकायदेशीर हॉटेल पाडण्यासाठी 5.75 लाखांचा खर्च आला होता. हा खर्च बांधकाम मालकाकडूनच वसूल करुन घ्यावा, अशी मागणी कोलवा सिव्हिक फोरमच्या निमंत्रक ज्यूडीत आल्मेदा यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या बांधकामाच्या विरोधात आल्मेदा यांनी सीआरझेड प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने हे बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर हे संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त केले होते.

या कामासाठी प्रशासनाला 5.75 लाख खर्च आला होता. तो खर्च फुर्तादो यांनी भरावा यासाठी नोटीसही पाठविण्यात आली होती. मात्र नंतर दक्षिण गोव्याच्या उप जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे हॉटेल मालकाला ही रक्कम भरण्यापासून सूट दिली होती.

या आदेशाला हरकत घेत आल्मेदा यांनी काल शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांच्यासमोर तक्रार दाखल करत उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी दिलेला हा आदेश बेकायदेशीर असून तो त्वरित रद्द करून ही रक्कम बांधकाम मालकांकडून वसूल करून घ्यावी, अशी मागणी केली आहे.

ज्याने कायदा धाब्यावर बसवून बेकायदेशीर बांधकाम केले त्याला अशी सूट मिळाल्यास ती त्याला दिलेली बक्षिसी ठरणार असून त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या रकमेचा बेकायदेशीर कामासाठी वापर केल्यासारखे होईल, असे आल्मेदा यांनी म्हटले आहे.

दरम्यान अशी बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी सीआरझेड प्राधिकरणाने दुसऱ्या यंत्रणांचा वापर न करता यासाठी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT