Cosmas Salu D’Souza Dainik Gomantak
गोवा

Goa Special Story : गोव्याचा कलम तज्ज्ञ इंजिनिअर

कोस्मास डिसोझाच्या कुटुंबाची घरची कित्येक एकर शेतीही होती. या शेतीत राबणाऱ्या त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी आणि मजुरांसाठी कोस्मास पेज घेऊन जायचा. शेतातली ही ‘सहल’ जरी थोडी कष्टदायक असली तरी छोट्या कोस्मासला ती आवडायची.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Special Story : कोस्मासची आई पावसाळ्याच्या तोंडावर काकड्या आणि इतर भाजी परसदारी पेरायची. पावसाळा असल्याने या बियाण्यांना पाणी देण्याची आवश्‍यकता नसायची. पाऊसच त्यांची काळजी घ्यायचा. आपल्या आईकडे पाहून लहानगा कोस्मासही काही बियाणी स्वत: रुजत घालायचा. त्यांना अंकुर फुटताना आणि त्यांची रोपे वाढताना पहायचा. काही लोक प्रयत्न करत, चुकांतून शिकत एखाद्या विषयात कौशल्य प्राप्त करतात. कोस्मासचंही तसंच काहीसं होतं. त्याला आपल्या परसदारीच्या रोपांबरोबर बागडायला आणि आईला मदत करायला आवडायचं. आईला मदत करता करता आणि विविध रोपांवर नकळतच प्रयोग करता कोस्मासचे बागायती कौशल्य हळूहळू विकसित होत चालले होते.

कोस्मास डिसोझाच्या कुटुंबाची घरची कित्येक एकर शेतीही होती. या शेतीत राबणाऱ्या त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी आणि मजुरांसाठी कोस्मास पेज घेऊन जायचा. शेतातली ही ‘सहल’ जरी थोडी कष्टदायक असली तरी छोट्या कोस्मासला ती आवडायची. खरीप आणि रब्बी पिके, बियाण्यांची पेरणी, विहिरीतून पाणी ओढण्याचे ज्ञान हळूहळू त्याला येत चालले होते. पण जेव्हा त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्याला इंजिनियरिंगकडे वळावे लागले. कारणे खूप होती - एकतर त्याला करियरसंबंधी मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. दुसरं म्हणजे त्यावेळी गोव्यात शेतीविषयक उच्च शिक्षण उपलब्ध नव्हते आणि त्याने शेतीकडे लक्ष द्यावे अशी त्याच्या पालकांचीही इच्छा नव्हती. शेतीची उत्कट आवड असूनही त्याला या कारणांमुळे आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली.

कालांतराने त्याने मॅकेनिकल इंजिनियारिंगची पदवी मिळवली. सेझा गोवा या आस्थापनात नोकरीही केली. पण दरम्यानच्या काळात शेतीशी किंवा वनस्पतीशी असलेले आपले नाते त्याने तुटू दिले नाही. झाडा-माडांवर चढणे हादेखील त्याचा त्यांच्याशी असलेल्या नात्याचाच भाग होता. कोस्मास अभिमानाने सांगतो की कितीही उंच माडावर तो चढू शकतो. तो सेझा गोवा कंपनीत नोकरीला असताना, 1989 या वर्षी कंपनीच्या कामगारांनी गेटवर धरणे धरले होते. गेटबाहेर ये-जा करता येत नसल्याने कंपनीचे अधिकारी भुकेले राहिले होते. त्यात कोस्मासही होता. त्यावेळी कंपनीच्या आवारात असलेल्या माडांवर चढून, त्यांच्या शहाळ्यांनी, तिथे बंदिस्त असलेल्या अधिकाऱ्याची तहान-भूक कोस्मासने भागवली होती.

कलमे (ग्राफ्टिंग) तयार करण्यामधला तर कोस्मास स्वयं-शिक्षित तज्ज्ञ आहे. 5-6 वर्षे इतक्या लहान वयाचा असताना तो त्यातले काही प्रयोग करायचा. प्रयोग बालीश असायचे पण त्यातून तो पुढे शिकत गेला. पुढच्या काळात शेती हा जरी त्याच्या औपचारिक शिक्षणाचा विषय राहिला नसला तरी वेगवेगळी कलमे करणे हा त्याचा छंद राहिला. शालेय आणि महाविद्यालयीत शिक्षण घेत असताना समांतरपणे झाडांविषयीचे त्याचे प्रेमही विकसित होत राहिल्र होते. त्याच्या आईने त्याच्यात रुजवलेल्या झाडा-रोपांवरच्या प्रेमाला कलमे बनवण्याच्या कौशल्याने तो एक वेगळे रूप देत होता.

कलमे बनवण्याच्या मुख्यतः दोन पध्दती आहेत- ‘बार्क ग्राफ्टींग’ आणि ‘स्टोन ग्राफ्टींग’. बार्क ग्राफ्टींग ही कलमे बनवण्याची परंपरागत पध्दत आहे. त्यातून एकाच आंब्याच्या झाडावरून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळवता येतात. अर्थात त्यासाठी काही नियम पाळणे व काळजी घेणे जरुरीचे आहे. हल्ली ही पध्दत कमी होत चालली आहे कारण ती फार किचकट आहे. पण कोस्मास हीच पद्धत वापरतो. तो मुख्यत आंब्याचे उत्पादन घेतो. आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींचा त्याचा इतका अभ्यास आहे की तो म्हणतो, केवळ झाडाची पाने बघून आंब्याचे झाड कोणत्या जातीचे आहे ते तो ओळखू शकतो.

सेंद्रिय खते वापरूनच तो आपली पिके घेतो. अर्थात फळविक्री हा त्याचा मुख्य व्यवसाय नसल्यामुळे तो त्यांचे फारसे मार्केटिंग करण्यास जात नाही. ‘ऑर्गेनिक फ्रुट्स’ या त्याच्या फेसबुक पानावर त्याच्या उत्पादनांची माहिती आपल्याला मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT