MLA Anton vaz Dainik Gomantak
गोवा

Anton Vaz: कुठ्ठाळीत स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याची मागणी; मुख्यमंत्री सावंत यांना निवेदन सादर

Cortalim: तूर्त कुठ्ठाळी पंचायतीच्या बाजार संकुलामध्ये पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी पंचायतीचीही मान्यता मिळाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळी मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी व चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारावे, अशी मागणी कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या कुठ्ठाळी मतदारसंघ हा वेर्णा पोलिस स्थानकाच्या कार्य क्षेत्रात येत असून नुवे मतदारसंघातील तीन पंचायतींचाही त्यात समावेश आहे. अशा परिस्थितीत गुन्ह्याचा छडा लावण्यात वेर्णा पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर ताण येतो.

कारण या पोलिस स्थानकाच्या कार्य कक्षेत संपूर्ण वेर्णा परिसर, नुवे मतदारसंघातील तीन पंचायती, वेर्णा औद्योगिक वसाहत, सांकवाळ औद्योगिक वसाहत, झुआरीनगर झोपडपट्टी, एम.ई.एस कॉलेज परिसर, कुठ्ठाळी मतदारसंघातील कुठ्ठाळी ग्रामपंचायत, केळशी ग्रामपंचायत, कासावली ग्रामपंचायत, वेळसाव ग्रामपंचायत, सांकवाळ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या सर्व भागातील लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली आहे. या सर्व परिसरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने गुन्ह्यांचा छडा लावण्यात वेर्णा पोलिस ठाण्यावर ताण येत आहे. त्यामुळे कुठ्ठाळी येथील बाजार संकुलामध्ये सध्या स्थित असलेली पोलिस चौकी विस्तारून त्याचे पोलिस ठाण्यात रूपांतर केले जाऊ शकते, असे आमदार आंतोन वाझ यांचे म्हणणे आहे.

जनतेची होईल चांगली सोय

हे पोलिस ठाणे बाजार संकुलामध्ये सुरू झाल्यास कुठ्ठाळी मतदारसंघातील सर्व पाचही पंचायती एका छताखाली येणार असून सर्व जनतेला सोयीस्कर ठरणार आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालून ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे. याबाबतीत कुठ्ठाळीतील सर्व पंचायतींनासुद्धा कळविण्यात आले असून पंचायतींकडून सहकार्य मिळत आहे, असे आमदार आंतोन वाझ यांनी सांगितले.

सरकार, पंचायतीची मान्यता

आमदार आंतोन वाझ यांनी कुठ्ठाळीत स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १३ जून २०२३ रोजी सादर केले आहे. कुठ्ठाळी पोलिस ठाण्यासाठी यापूर्वी सरकारची मान्यताही मिळालेली आहे. तरीही त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. पोलिस मुख्यालय तसेच गृह खाते स्वतंत्र पोलिस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी जागेची पाहणी करेपर्यंत तूर्त कुठ्ठाळी पंचायतीच्या बाजार संकुलामध्ये पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी कुठ्ठाळी पंचायतीचीही मान्यता मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT