Cortalim News Dainik Gomantak
गोवा

Cortalim: दोन दोन बस शेड, तरीही प्रवासी उन्हात! कुठ्ठाळीतील विचित्र प्रकार; रस्त्यावरच करावी लागते प्रतीक्षा

Cortalim Bus Stand: कुठ्ठाळी येथे दोन बस प्रवासी निवारा शेड आहेत, तथापि त्यांचा वापर प्रवाशांना करता येत नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: कुठ्ठाळी येथे दोन बस प्रवासी निवारा शेड आहेत, तथापि त्यांचा वापर प्रवाशांना करता येत नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देऊन त्या प्रवाशी शेडची साफसफाई करावी तसेच तेथील अडथळे दूर करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

कुठ्ठाळी येथे एका व्यावसायिकाने एक बस प्रवासी निवारा उभारली आहे.तर दुसरीकडे कुठ्ठाळी पंचायतीने आपली निवारा शेड बांधली आहे. या दोन्ही निवारा शेडचा वापर प्रवासी पूर्वी करीत होते. तथापी आता त्या दोन्ही शेडची योग्य देखभाल होत नसल्याने तेथे झुडपे तयार झाली आहेत.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याकडेला लोखंडी बॅरिकेड्स उभारताना त्या निवारा शेडकडे जाण्यासाठी वाटच ठेवली नाही. तेथील वाट बंद झाल्याने प्रवाशांना त्या निवारा शेडचा वापर करता येत नाही.

त्यामुळे भर उन्हात उभे राहून प्रवाशांना बसची वाट पाहत लागत आहे.निवारा शेड असूनही त्याचा वापर करता येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या उन्हाची झळ सहन होत नाही. तथापी बसची वाट पाहताना प्रवाशांना उन्हाची झळ सहन करावी लागते. त्याचा त्यांना त्रास होत आहे. याप्रकरणी संबंधित तेथील गैरसोय दूर करून प्रवाशांची सोय करतील काय असा प्रश्र्न विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT