कोरोनामुळे (Covid 19) कोकण रेल्‍वे (Konkan Railway) महामंडळाला तब्बल 360 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.  Dainik Gomantak
गोवा

कोरोनाचा कोकण रेल्वेला महामंडळाला 360 कोटींचा फटका

‘रो रो’ सेवा ही कोकण रेल्वेचा (Konkan Railway) महसुलाचा मुख्य स्रोत होता, पण ती वाहतुकच बंद राहिल्याने जास्त फटका बसला. आता ती वाहतूक सुरू झालेली असली तरी अजून पूर्वपदावर आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोविडच्या (Covid 19) पहिल्या लाटेमुळे विस्कळीत झालेली रेल्‍वे वाहतूक अजूनही पूर्ववत होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्‍वे (Konkan Railway) महामंडळाला तब्बल 360 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली. प्रवासी तसेच मालगाड्या व कोकण रेल्वेची रोरो वाहतुकही कोविड काळात ठप्प झाली. मार्च 2020 मध्ये बंद झालेली प्रवासी व मालवाहतूक जुलै 2021 मध्ये सुरू झाली असली, तरी अजूनही ती पूर्णतः सुरू झालेली नसल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अजूनही ‘विशेष’ गाड्या

‘रो रो’ सेवा ही कोकण रेल्वेचा महसुलाचा मुख्य स्रोत होता, पण ती वाहतुकच बंद राहिल्याने जास्त फटका बसला. आता ती वाहतूक सुरू झालेली असली तरी अजून पूर्वपदावर आलेली नाही. आता एक-एक करून प्रवासी गाड्या सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पूर्वीप्रमाणे प्रतिसाद नाही. त्यामुळे बहुतेक गाड्या ‘विशेष’ म्हणूनच चालविल्या जातात. त्यासाठी आगाऊ आरक्षणाची सक्ती केली गेली आहे. कोकण कन्या, मंगळुरू एक्सप्रेस यासुध्दा त्याला अपवाद नाहीत. मंगळुरू ही जरी एक्सप्रेस असली, तरी ती लोकल म्हणूनच सोडली जाते. सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुटत असल्या तरी त्या ‘विशेष’ असतात, असे या सूत्रांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT