The corona test will be held at the district hospital in Goa
The corona test will be held at the district hospital in Goa 
गोवा

गोव्यातील जिल्हा इस्पितळातच होणार कोरोना चाचणी

दैनिक गोमंतक

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवासाच्या उद्देशाने ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणी केली जाणार नाही. मात्र राज्यातील दक्षिण आणि उत्तर गोव्यातील जिल्हा इस्पितळांमध्ये कोरोना पडताळणी चाचणी सशुल्क करता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. राज्यातून प्रवासाच्या कारणासाठी महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांसाठी ही माहिती मंत्री राणे यांनी ट्विटरवरून दिली.


महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. ही बातमी पसरताच गोव्यात फिरण्यासाठी अथवा वेगवेगळ्या कारणांच्या निमित्ताने आलेल्‍या अनेकांनी चाचण्या करण्यासाठी लॅबमध्ये धाव घेतली. गोमेकॉमध्‍ये ही चाचणी मोफत केली जात असल्याचे समजताच अनेकांनी तिकडे धाव घेतली. पर्यटकांचा संभ्रम होऊ नये म्‍हणून मंत्री राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.


गोवा मेडिकल कॉलेज आणि आरोग्य खाते यांनीही प्रवासाच्या उद्देशाने संबंधित कोविड चाचणी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. गोव्यातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे. गोवा सरकारने दिलेल्या एसओपीनुसार गोमेकॉ आणि आरोग्य खात्यात आधीपासूनच ‘आरटीपीसीआर’ चाचण्या केल्या जात असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली. राज्यातील लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे यासंदर्भातील निर्णय लवकरच घेणार असल्याचेही मंत्री राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

SCROLL FOR NEXT