Corona in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचा धोका वाढला

आरोग्य यंत्रणा सतर्क; बाधितांची संख्या चोविस तासात 50 वर

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात कोरोनाचा संसर्ग घटतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वाटत असतानाच गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाधितांची संख्या शंभराच्या वर पोहचली आहे. आज शुक्रवारी तब्बल ५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी मास्क वापरण्याबरोबरच लसीकरणावरही भर द्यावा असे आवाहन आरोग्य संचालक डॉ.गीता काकोडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर आणि कृतिदल सदस्य डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते.

डॉ. काकोडकर यांनी सांगितले, ‘कोरोनाची चौथी लाट साथ सुरू आहे की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, 11 एप्रिलपासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत हा आकडा पन्नासच्या वर गेला होता आणि 30 मेपासून आतापर्यंत बाधितांची संख्या 126 झाली असून त्यात काल 50 जणांची भर पडून 176 संख्या झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांच्यापैकी एक लाख 80 हजार लोकांनी विविध सबबी सांगून बुस्टर डोस घेतलेला नाही. हे अत्यंत गंभीर आहे. हा डोस टाळणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखेच आहे, असे काकोडकर म्हणाल्या.

रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी असले तरी ज्येष्ठ नागरिकांमधील धोका टळलेला नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचा तर्क न लढवता कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करावे. तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ.गीता काकोडकर यांनी केले.

आरोग्य प्रशासनाने पाच जून रोजी लसीकरणाचा महोत्सव अर्थात टिका उत्सव आयोजित केला आहे. यात साठ वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांनी या लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे. याशिवाय सोमवार, बुधवार व शुक्रवारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत लस मिळेल.

राज्यातील पंधरा ते 18 वयोगटातील 93 टक्के विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तर 80 टक्के विद्यार्थ्यांनी दुसरा डोसही घेतलेला आहे. तर 12 ते 14 वयोगटातील 65 टक्के विद्यार्थायांनी पहिला डोस घेतलेला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यात सध्यातरी अडचण नाही, असे लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT