Blood Donation Camp  Dainik Gomantak
गोवा

Blood Donation Camp : कोरगाव येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Blood Donation Camp : पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष सुनील शेट्ये, संयोजक समीर मांद्रेकर, नेहाल कशाळकर आदी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Blood Donation Camp :

मोरजी, कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून गोमेकॉच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३५ पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले.

उद्‍घाटन सोहळ्याला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर, गोमेकॉचे डॉ. संजय कोरगावकर, डॉ. मुग्धा सनील, संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे, सचिव नीलकंठ थळी, सह खजिनदार चंद्रकांत शेट्ये, प्राचार्य जुही थळी, मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी,

पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष सुनील शेट्ये, संयोजक समीर मांद्रेकर, नेहाल कशाळकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्‍घाटन करण्यात आले. चेअरमन परशुराम गावडे, नीलकंठ थळी, जुही थळी, चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते मान्यवरांना मानचिन्ह प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन विठोबा बगळी यांनी केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जुही थाळी, संयोजक समीर मंद्रेकर, नेहाल कशाळकर, विठोबा बगळी, प्रशांत रसाई कर, भारती कांबळे, दीपश्री सोपटे, सलुजा पेडणेकर, अंकुश बुगडे, दत्तात्रय गावस, गोपाळ शेट्ये,

अशोक परब, प्रशांत गावडे, अर्जुन गावडे, प्रवीण शेट्ये, तुलसीदास कांबळी, विवेक शिरोडकर, राजेश गावडे आदींनी परिश्रम घेतले. तसेच गोमेकॉचे डॉ. संजय कोरगावकर, डॉ. मुग्धा सानिम, तुषार देसाई, मेडिनी नाईक, हरीश आमोणकर, दशरथ गांवकर, लक्ष्मीकांत यांचे विशेष साहाय्य लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT