Subhash Shirodkar
Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar : ऑर्गेनिक शेती सहकार क्षेत्राखाली आणण्याचा सरकारचा विचार : सुभाष शिरोडकर

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Shirodkar : ऑर्गेनिक कृषी उत्पादनांना संपूर्ण जगात वाढती मागणी असल्याने ऑर्गेनिक शेती सहकार क्षेत्राखाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल अशी महिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मडगाव येथील दक्षिण गोवा सहकार सोसायटी रजिस्ट्रार कार्यालयाचे आज फातोर्डा येथील जलसिंचन खात्याचा इमारतीत स्थलांतर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. हे उत्पादन सहकारी सोसायट्यांच्या मार्फत निर्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

मांडप नावेली येथे सहकार भवन उभारण्याची योजनाही त्यांनी बोलून दाखविली. सहकारी सोसायट्यांचा कारभार व्यवस्थित चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरोडकर हे जलसंसाधन मंत्री असून अमृत सरोवर योजनेखाली राज्यातील सुमारें 120 तळ्यांचे संवर्धन करण्यात येणारं असून मार्च महिन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

Sanguem News : सांगेत मुख्य रस्त्यावरील गटारांची सफाई गरजेची

Goa Today's Live News: पणजी महानगरपालिका कर कपात करणार - महापौर रोहित मोन्सेरात

Auto Claim Settlement Facility: 6 कोटींहून अधिक पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सुविधेअंतर्गत मिळणार आता एवढे लाख

Cylinder Blast In Bambolim: बांबोळीत दोन सिलिंडरचा स्फोट; मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग

SCROLL FOR NEXT