Cooperation Department : Dainik Gomantak
गोवा

Cooperation Department : सहकार खात्यात शिस्त आणणार : प्रेमेंद्र शेट

Cooperation Department : राष्ट्रीय सहकार सप्ताहाला मये येथे सुरवात

गोमन्तक डिजिटल टीम

Cooperation Department : डिचोली, सहकार क्षेत्रात प्रगती साध्य करायची असल्यास विश्वास आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकार खात्यात सुधारणा आणि शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

मये येथे आयोजित सत्तराव्या ‘राष्ट्रीय सहकार साप्ताहा’च्या उद्‌घाटन सोहळ्यात आमदार शेट प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

मये ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने राष्ट्रीय आणि गोवा राज्य सहकारी संघातर्फे मंगळवारी (ता.१४) कुंभारवाडा येथील स्व. भानुमती शेट सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आणि महेश सावंत, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामचंद्र मुळे, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, मार्केटिंग फेडेरेशनचे अध्यक्ष सखा मळीक, प्रमुख वक्ते ॲड. विनायक नार्वेकर आणि मये ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण किनळकर उपस्थित होते.

आमदार शेट यांच्या हस्ते सहकार ध्वज फडकावून आणि दीप प्रज्वलित करून सहकार सप्ताहाचे उद्‌घाटन करण्यात आले. ‘सहकार क्षेत्राचा सध्याचा विकास’ ही यंदाच्या सहकार सप्ताहाची संकल्पना आहे.

याविषयावर प्रमुख वक्ते आणि सहकार क्षेत्रातील एक तज्ज्ञ ॲड. विनायक नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रात आणखीन प्रगती व्हायची असेल, तर सहकार खात्यात सुधारणा घडवून आणावी. अधिकाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मतही ॲड. नार्वेकर यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Goa Live News: भोम-अडकोण पंचायतच्या ग्रामसभेत ठराव

SCROLL FOR NEXT