Datta Damodar Naik  Dainik Gomantak
गोवा

Datta Naik Case: जामीन मिळणार का अटक होणार? दत्ता नायक अटकपूर्व जामीन अर्जावरील फैसला सोमवारी

Datta Naik: नायक यांनी भाजप सरकारच्या विरोधात याच मुलाखतीत विरोधी भाष्य केल्याने त्यांना सतावण्यासाठी त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद केला आहे, असा दावा केला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मंदिरे आणि मठ यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलेले विचारवंत आणि साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी सोमवारपर्यंत राखून ठेवला.

दरम्यान, आज सकाळी नायक यांनी काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी दिली. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव चिराग नायक हे होते. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. यासंबंधी नायक यांना विचारले असता, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण कोणतेही भाष्य करू शकत नाही. मात्र, आपल्याला काय सांगायचे आहे ते पोलिसांना सांगितले आहे, असे सांगितले.

गुरुवारी (०९ जानेवारी) न्या. जोशी यांच्यासमोर या अर्जावरील सुनावणी झाली होती. त्यावेळी नायक यांच्यावतीने बाजू मांडणारे अॅड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनी नायक यांचे हे वक्तव्य धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्याखाली येत नाही, असा दावा केला होता.

नायक यांनी भाजप सरकारच्या विरोधात याच मुलाखतीत विरोधी भाष्य केल्याने त्यांना सतावण्यासाठी त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद केला आहे, असा दावा केला होता. तर सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी हे प्रकरण प्राथमिक अवस्थेत असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आणखी वेळ हवा, हे न्यायालयासमोर मांडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT