Poonam Pandey Goa Video  Dainik Gomantak
गोवा

Poonam Pandey Controversy: वादग्रस्‍त पूनम पांडेला न्‍यायालयाचे समन्‍स

Poonam Pandey Controversy: सर्व्हायकल कॅन्सरविषयी स्वतःचा मृत्यू झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्‍हायरल केल्‍यामुळे आणि नंतर त्‍या गोष्‍टीचा इन्‍कार केल्‍याने सध्‍या चर्चेत आलेली वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने चापोली धरण परिसरात 2020 साली अश्लील व्हिडीओ शूट केला होता.

दैनिक गोमन्तक

Poonam Pandey Controversy: सर्व्हायकल कॅन्सरविषयी स्वतःचा मृत्यू झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्‍हायरल केल्‍यामुळे आणि नंतर त्‍या गोष्‍टीचा इन्‍कार केल्‍याने सध्‍या चर्चेत आलेली वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने चापोली धरण परिसरात 2020 साली अश्लील व्हिडीओ शूट केला होता.

काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने दोन-तीनदा नोटीस पाठवून तिला आणि तिच्या पतीला सुनावणीस हजर राहण्यास बजावले होते. मात्र, दोघे एकदाही सुनावणीस आले नाहीत. त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा समन्स त्या दोघांना बजावला आहे. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना 28 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री पूनम पांडेला अटक

अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. आपल्या अत्यंत हॉट आणि बोल्ड व्हिडीओंसाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडे विरोधात गोव्यामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची चौकशी केली होती.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने पूनम पांडे विरोधात एफआयआर दाखल केली होती. यात तिच्यावर गोव्याच्या  चपोली डॅमवर अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, चौकशीनंतर तिला कदाचित सार्वजनिक स्थानी अश्लील हरकती केल्याप्रकरणी अटक करण्यात येऊ शकते.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT