Contractors for road works in Panaji suspended for two years nilesh cabral's action  Dainik Gomantak
गोवा

रस्त्याच्या भ्रष्टाचारात कंत्राटदाराचा बळी; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

मंत्री नीलेश काब्राल यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. पणजीमधील रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदार सी. ए. इब्राहिम यांचा बांधकाम परवाना तब्बल दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला असून त्यांच्याकडून इतर कामेदेखील काढून घेण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात पहिल्याच पावसात राज्यभरातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग वाहून गेले आहे. राजधानीतील प्रमुख रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांवरच मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी कंत्राटदारांच्या वतीने जनतेची माफी देखील मागितली.

(Contractors for road works in Panaji suspended for two years nilesh cabral's action)

बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी मंत्री नीलेश काब्राल यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. पणजीमधील रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदार सी. ए. इब्राहिम यांचा बांधकाम परवाना तब्बल दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला असून त्यांच्याकडून इतर कामेदेखील काढून घेण्यात आली आहेत.

Contractors for road works in Panaji suspended for two years

रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल कंत्राटदाराचा परवाना जरी रद्द केला असला, तरी ज्यांच्या निगराणीखाली ही कामे होतात, त्या अधिकाऱ्यांवर मात्र अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यांना जबाबदार धरणे अत्यंत गरजेचे आहे, असे अधिकारी मात्र या सगळ्यात नामानिराळे राहिले आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT