Goa Road Repair  Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: 'साबांखा'च्या नोटिशीला उत्तर नाहीच; थेट रस्ते दुरूस्ती सुरु

Goa Roads: १३० हून अधिक कंत्राटदारांना नोटीसा पाठवल्यानंतर कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने १३० हून अधिक कंत्राटदारांना नोटीसा पाठवल्यानंतर कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कंत्राटदारांपैकी कोणीही नोटीशीला उत्तर दिलेले नाही. त्याऐवजी त्यांनी प्रत्यक्षात रस्ता दुरुस्ती करणे पसंत केले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की रस्त्याचे काम केल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत तो रस्ता खड्डेमय झाला, तर कंत्राटदारांनी रस्ता स्वखर्चाने दुरुस्त करायचा असतो. तशी अट निविदेतच असते. त्याचे स्मरण कंत्राटदारांना नोटीशीतून करून दिले आहे. त्‍यांंनी आम्ही रस्ते दुरुस्त करतो, असे उत्तर देणे अपेक्षित होते. काहींची मुदत आधीच संपली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गती!

पार्सेकर यांनी सांगितले, की रस्ता दुरस्तीचे काम कंत्राटदारांनी केले नसते तर खाते ते काम अन्य यंत्रणेकडून करवून घेऊ शकले असते. त्याचा खर्चही मूळ रस्ता दुरुस्ती केलेल्या कंत्राटदाराकडून वसूलण्याची कायद्यात तरतूद आहे. त्याचा वापर केला असता. रस्ते खड्डेमय होऊ नयेत, याची काळजी कंत्राटदारांनी घेणे आवश्यक आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर खात्याने या कामाला प्राधान्य व गती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT