contract workers in Bambolim expressed discontent Dainik Gomantak
गोवा

नऊ वर्षे काम करून काय फायदा? ; बांबोळीतील कंत्राटी कामगारांची विचारणा

विरोधी पक्षनेते मायकल लोबो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर नेत्यांनी कंत्राटी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील मानसोपचार संस्थेमधील गेली नऊ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आल्याने इतकी वर्षे काम करून काय फायदा? अशी विचारणा या कामगारांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आझाद मैदानावर निदर्शने करीत नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. (contract workers in Bambolim expressed discontent)

विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर नेत्यांनी कंत्राटी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी लोबो यांनी सोमवारी (ता. 18) मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या मागण्यांविषयी तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार असल्याचे आश्‍वासन दिले.

मानसोपचार संस्थेच्या इस्तिपळात (Hospital) सुमारे 28 कर्मचारी ‘पेशंट केअर ॲटंडंट’ म्हणून गेली 9 वर्षे कंत्राटी पद्धतीवर 2014 पासून काम करत आहेत. या संस्थेने नोकरभरती करण्यासाठी जाहिरात देऊन त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्याची नोटीस देऊन सेवेतून काढण्यात येत असून त्यांच्या जागी अननुभवी उमेदवारांना नियमित सेवेत घेण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नाविरोधात आज या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या कर्मचाऱ्यांमधील काहींचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे. कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नोकरभरतीवेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचार केला जाईल असे आश्‍वासन दिले होते त्यामुळे केव्हा तरी सेवेत कायम होऊ अशी आशा होती ती सुद्धा संपली आहे. या वयामध्ये नव्याने नोकरी कोठे मिळणार असा प्रश्‍न या कर्मचाऱ्यांनी केला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अगोदर आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant), आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना द्यावीत. आज निदर्शने केली तरी उद्या ती करू नका. निवेदन सोमवारपर्यंत मुख्यमंत्र्यांना द्या व मंगळवारपर्यंत त्याची वाट पाहा. जर सरकारने कोणतीच कृती केली नाही तर तुम्ही न्यायासाठी लढा सुरू करा, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे आश्वासन लोबो व पाटकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT