Contract workers' demands fulfilled by Goa government Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ‘त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

कंत्राट नूतनीकरण : मानवी वर्तन संस्थेेतर्फे उपोषण मागे

दैनिक गोमन्तक

पणजी : कामावर रूजू करावे, यासाठी मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेचे कंत्राटी कर्मचारी 14 एप्रिलपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसले होते. मंगळवारी सरकारने त्यांना कंत्राट नूतनीकरण केल्याचे आदेश जारी केले. (Contract workers' demands fulfilled by Goa government)

कर्मचाऱ्यांनी सरकारचे आभार मानत धरणे आंदोलन संपल्याची घोषणा केली. यावेळी कर्मचारी महादेव परब म्हणाले, गेले चाळीस दिवस आमच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत होतो. आज सरकारने आम्हाला कंत्राट नूतनीकरण करून कामावर रूजू होण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आम्हाला आश्‍वासन दिले होते, त्याचसोबत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनीही आम्हाला साहाय्य केले. आता नूतनीकरण केलेले कंत्राट संपण्याअगोदर आम्हाला कामात कायमस्वरूपी रूजू करून घ्यावे.

आरोग्यमंत्र्यांचे साहाय्य

भगवान केरकर म्हणाले, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला जे साहाय्य केले आहे ते विसरणार नाही. आम्हाला विश्‍वास होता, की सरकार आम्हाला मदत करेल. आरोग्यमंत्री गोव्याबाहेर होते. पण गोव्यात येऊन आमच्या फाईलवर स्वाक्षरी केली आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. काशिनाथ परब म्हणाले, सद्यस्थितीत आमच्याकडे रोजगाराचे कोणतेच साधन नव्हते. सरकारने आदेश काढून आम्हाला न्याय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT