पणजी: बंदर कप्तान खात्याच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर छत उभारले गेल्याने इमारतीला नवा लुक मिळाला असून, मांडवी नदीत जहाज अवतरल्याचा भास निर्माण होऊ लागला आहे.
मांडवी नदीच्या किनारी बंदर कप्तान खात्याने टर्मिनल उभारण्यास सुरवात केली तेव्हा त्याला विरोधही झाला. २०१५ पासून हा टर्मिनल उभारण्याचे चिंतिले जात होते. त्यावेळी गोवा किनारा क्षेत्रीय व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) २०१५ मध्ये प्रकल्पाला दिलेल्या ना हरकत दाखल्याची मुदत जुलै २०२० मध्ये संपली होती.
त्यामुळे बंदर खात्याला पुन्हा एकदा जीसीझेडएमएकडे बांधकामासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज करावा लागला होता. सन २०१९ निविदा प्रक्रियेनुसार या टर्मिनलचे काम २०२४ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते, पण ते झाले नाही. आता या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीवर सध्या छताची उभारणी करण्यात आली असून, दूरवरून हा टर्मिनल जहाजासारखा भासत आहे.
साल २०२२ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) टर्मिनल इमारतीचे बांधकाम तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले. त्याशिवाय प्रस्तावित प्रकल्पाचा जलद पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (ईआयए) अहवाल किनारी प्राधिकरणाकडे सादर केल्यानंतर व परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करता येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार बंदर कप्तानने जीसीझेडएमएकडे आपला ईआयए अहवाल सादर केला आणि प्रकल्पासाठी मंजुरी दिली गेली आणि काम गतीने सुरू झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.