Swimming pool  Dainik Gomantak
गोवा

सडा येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे काम पूर्ण

सदर जलतरण तलाव हा मुरगाव तालुक्यातील एकमेव तलाव आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: सडा येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे लवकरण लोकार्पण करण्यात येणार आहे. मुरगावचे माजी आमदार व माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या प्रयत्नामुळे सडावासीयांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने सडावासीय व आसपासच्या परिसरातील नागरिक सुखावले आहेत. (Construction of swimming pool completed in Sada, Goa)

सदर जलतरण तलाव हा मुरगाव तालुक्यातील एकमेव तलाव आहे. या तलावामुळे युवकांचे जलतरणपटू होण्याचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागणार असून याचे लोकार्पण कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

सड़ापारावर जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय धर्तीचा हा जलतरण तलाव राज्यासाठीही भूषण ठरणारा आहे. या तलावातील मुख्य तलाव 50 मीटर लांबीचा व 25 मीटर रुंदीचा आहे. त्याची खोली दोन मीटर आहे. डायव्हिंग पूलची लांबी 20 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. खोली साडेचारमीटरची आहे. येथे येणार या लहान मुलांसाठीही एक मीटर खोल असलेला जलतरण तलाव आहे.

कचरा दुर्गंधीवर उपाय हवा

सदर जलतरण तलाव (Swimming pool) हा जीआरबी वसाहतींच्या इमारतीपासून काही अंतरावर आहे. इमारतीच्या बाजूने अडथळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावाची लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे. तसेच या तलावापासून काही अंतरावर मुरगाव पालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीचा सामना तेथे येणाऱ्यांना करावा लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी काहीतरी उपाययोजना होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT