Margao Urban Bank  Dainik Gomantak
गोवा

‘मडगाव अर्बन बॅंके’च्‍या ठेवीदारांना दिलासा

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करणार

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गतसाली ऑगस्ट महिन्यात लिक्विडेशनमध्ये गेलेल्या मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ठेवीदारांसमोर ठेवीच्या रूपाने ठेवलेली आपली रक्कम परत मिळेल की नाही, याबद्दल साशंकता होती. बॅंकेच्या दहा हजार ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले होते. आता डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) छाननी करून व ठेवीदारांच्या अर्जांचा अभ्यास करुन पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम परत करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे.

गेल्या आठवड्यापासून ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे लिक्विडेटरने नियुक्त केलेले अधिकारी किशोर आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत दहा हजारपैकी दोन हजार ठेवीदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही अर्ज स्वीकारणे चालू ठेवल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

मडगाव अर्बन बॅंकेचे एकूण 56,635 खातेधारक आहेत. मात्र केवळ दहा हजार खातेधारकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज केले. यातील जवळ जवळ 99 टक्के खातेधारकांना त्यांची पूर्ण म्हणजे पाच लाखापर्यंतची रक्कम मिळणार आहे. खातेधारकांचे पैसे परत करण्यासाठी बॅंकेने 136 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी बॅंकेच्या एकूण ठेवी 189.81 कोटी रुपये आहेत. जी बाकी रक्कम लागेल ती ऋण वसुलीतून व बॅंकेची मालमत्ता विकून फेडली जाईल असेही आमोणकर यांनी सांगितले. लॉकरवाल्यांनी बॅंकेशी संपर्क साधून आपल्या वस्तू घेऊन जाव्यात असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT