Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'बडतर्फ' अंगणवाडी सेविकांना दिलासा

सेवेत घेणार: लोबो यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

दैनिक गोमन्तक

पणजी: अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी निवडणुकीपूर्वी तीव्र आंदोलन केल्यानंतर त्यातील सातजणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्री व संचालकांशी चर्चा करून पुन्हा सेवेत घेण्याचे व समाजकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना महिन्याभरात प्रलंबित आर्थिक सहाय्य देण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पणजीत आंदोलन सुरू केले होते व त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला होता. पोलिसांनी हा मोर्चा हाणून पाडल्यानंतर त्यातील 7 अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याने त्यांनी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची विनवणी केली होती. त्यानुसार मायकल लोबो यांनी अंगणवाडी सेविका, रेंट ए बाईक व्यावसायिकांचा प्रश्‍न तसेच आयपीएचबी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे त्यांचा विषयावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. जे सरकारी सेवेत कंत्राट पद्धतीवर आहेत त्यांना बेरोजगार करू नये अशी विनंती केली

यासंदर्भात अधिक माहिती देताना विरोधी पक्षनेते मायकल लोबो म्हणाले की, ज्या अंगणवाडी सेविकांना बडतर्फ करण्यात आले आहे त्या सातही जणांना लवकरच सेवेत घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. रेंट ए बाईक हा स्वयंरोजगार असून त्यांना 50 दुचाकींसाठी परवानगी आहे ती व 10 वाहनांवर आणली आहे. त्यासंदर्भातही संबंधित मंत्री व संचालकांशी चर्चा करून फेरविचार करण्याचे आश्‍वासन दिले. ज्या अंगणवाडी व आयपीएचबी कर्चमाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत त्यासंदर्भातही आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे व त्यांनाही निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील पंचायत प्रभाग फेररचनेसंदर्भात सुरू असलेल्या घोळाबाबत प्रभाग अधिसूचना जारी करण्यात आल्यावर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यात त्रुटी किंवा राजकारण केले गेले असल्यास त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून दिली जाईल. जर त्यामध्ये बदल झाला नाही तर विरोधकांना पुढे जाण्याची वाट मोकळी असेल. समाजकल्याणकारी योजनांखाली लाभार्थ्यांचे गेले चार महिने प्रलंबित असलेले आर्थिक सहाय्य एका महिन्यात दिले जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT