Goa Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023 : शिगमोत्सव परंपरा मोडू नका; मिरवणूक रविवारीच हवी!

पारंपरिक शिगमोत्सव समितीने घेतल्या नेत्यांच्या गाठीभेटी; परंपरा न मोडण्‍याचे साकडे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023 : शहरातील शिगमोत्सव रविवारी साजरा करण्याची मागील 40 वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा पर्यटन खात्याने रविवारऐवजी म्हापसा शहराला सोमवारी शिगमोत्सव मिरवणुकीसाठी दिवस दिला आहे. या प्रकारामुळे म्हापशातील नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडे आपला शिगमोत्सव रविवारीच व्हावा, यासाठी जोरदार मागणी केली आहे.

म्हापशाचा शिगमोत्सव हा पूर्वीप्रमाणे रविवारीच साजरा करण्यासाठी शिगमोत्सव समितीच्या सदस्यांसह जागरूक नागरिकांनी शनिवारी (ता.4) पणजी येथील भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली.

तानावडे यांना निवेदन सादर केले. या शिष्‍टमंडळात समितीचे सदस्य तुषार टोपले, माजी नगरसेवक तथा पत्रकार नारायण राठवड, समाजसेवक संजय बर्डे, राजू तेली, सितेश मोरे यांचा समावेश होता.

सोमवारी सातेरी देवीचा गुलालोत्सव

मागच्या 40 वर्षांपासून म्हापसा शिगमोत्सवाची सुरवात देवी शांतादुर्गा व देव राष्ट्रोळीला नमन केल्यानंतर चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्याने होते. यंदा सोमवार, दि. 13 रोजी ग्रामदेवी श्री सातेरी देवीचा गुलालोत्सव आहे. या धार्मिक कार्याची दखल घेऊन सरकारने शिगमोत्सव सोमवारऐवजी पुन्हा रविवारी साजरा करण्यासाठी अनुमती द्यावी, असा आग्रह म्हापसावासीयांनी धरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT