Goa Land Case Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ जमिनींची दिल्लीमधील बिल्डरांकडून खरेदी! खासगी वनक्षेत्र पुनर्संचियत करा! कवठणकरांची मागणी

Sunil Kavthankar: सरकारने नियुक्त केलेल्या समितीमुळे १ कोटी २० लाख चौ. मी. जमीन विकासासाठी खुली झाली आणि दिल्लीतील बिल्डरांनी त्या जमिनी खरेदी केल्या असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: २०२१ मध्ये सरकारने नियुक्त केलेल्या समितीने पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासगी वनक्षेत्रातील सर्व्हे क्रं. २७१ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे १ कोटी २० लाख चौ. मी. जमीन विकासासाठी खुली झाली आणि दिल्लीतील बिल्डरांनी त्या जमिनी खरेदी केल्या, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात सोमवारी त्यांनी वरील माहिती दिली. आपल्याकडे उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानिशी आपण ही माहिती देत असल्याचे सांगत कवठणकर म्हणाले, राज्यात मागील दोन-तीन वर्षांत येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाविरोधात काँग्रेसकडून आवाज उठवला जात आहे. उत्तर गोव्यापासून दक्षिण गोव्यापर्यंत या प्रकल्पांविषयी जनतेतून विरोधी सूर उमटू लागला.

भूतानी प्रकल्पाचा विषय काँग्रेसवर ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू होता. पण आम्ही पुराव्यानिशी तो आरोप खोडून काढला. मेगा प्रकल्प गोव्यात येणार असल्याचे आम्ही मागील काळात सांगत होतो. आता या प्रकल्पांविषयी काही कागदपत्रे हाती आली आहेत. राज्यातील भूतानी प्रकल्पाचा प्रश्‍न नाही,तर राज्यात येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पांचा आहे. राज्यातील सर्व खासगी वनक्षेत्र जमीन पुनर्संचियत करावी, अशी आमची मागणी असल्याचे कवठणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT