Congress Women President Alka Lamba Criticise BJ 
गोवा

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Congress Women President Alka Lamba Criticized BJP: अलका लांबा म्हणाल्या की, भाजपने देशाच्या लोकशाहीवरच घाव घातला आहे. महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव भाजपने घातला आहे. या पक्षाला मतदानाद्वारे आधी बाहेर फेका आणि भारतीयांच्या कल्याणासाठी युवा, नारी, श्रमिक तसेच शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी काँग्रेसला निवडून आणा, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी केले.

गोव्यातील भ्रष्टाचाराची आणि भ्रष्ट मुख्यमंत्र्यांची आधी चौकशी करा, अशी मागणीही लांबा यांनी केली. फोंड्यातील बसस्थानकावर मंगळवारी काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या जाहीर प्रचार सभेत लांबा बोलत होत्या. यावेळी उमेदवार विरियातो फर्नांडिस, गोवा फॉरवॉर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, दुर्गादास कामत, फोंडा काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, गिरीश चोडणकर, माजी आमदार लवू मामलेदार, प्रतिमा कुतिन्हो, राम कुंकळयेकर, एन. शिवदास तसेच इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

उमेदवार विरियातो फर्मांडिस यांनी यावेळी निकराची झुंज असून लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही. देशाच्या उत्कर्षासाठी आणि देशवासीयांच्या हितासाठी काँग्रेस सत्तेवर येणे आवश्यक असल्याचे विरियातो फर्नाडिस म्हणले. इतर मान्यवरांनीही यावेळी काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे सांगून हातालाच मतदान करा असे आवाहन केले. सूत्रसंचालन ॲड. सुरेल तिळवे यांनी केले. राजेश वेरेकर यांनी स्वागत केले.

महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य हैराण

अलका लांबा म्हणाल्या की, भाजपने देशाच्या लोकशाहीवरच घाव घातला आहे. महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे. विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या भाजप सरकारला स्मार्ट सिटी अस्तित्वात आणता आलेली नाही. एक किलो मिटर रस्त्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी असे सांगून काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर कृषी क्षेत्रावर लादलेला जीएसटी आधी रद्द करण्यात येईल असे लांबा म्हणाल्या.

लोकशाही धोक्यात : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. कदाचित ही निवडणूक शेवटची ठरण्याची भीती असून देश वाचवण्यासाठी यावेळी काँग्रेसलाच निवडून आणा असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT