Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : काँग्रेस पुन्हा करणार ‘म्हादई जागोर’

विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी, जागृतीसाठी समितीची स्थापना

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादई वाचविण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टला (डीपीआर) विरोध करण्यासाठी काँग्रेस आघाडीवर राहील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हादईच्या विषयावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर यापूर्वी म्हादई वाचविण्यासाठी सुरू केलेली ‘म्हादई जागोर'' हे आंदोलन राबविले जाईल, असे सांगितले.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ॲड. रमाकांत खलप, विजय भिके, तुलियो डिसोझा, अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीत काही ठराव मंजूर झाले. त्याविषयी पाटकर यांनी माहिती दिली. .

पाटकर म्हणाले, लोकभावनेचा आदर केला आहे, त्याशिवाय काही धोरणात्मक निर्णय लोकांच्या आकांक्षा व भावना पाहून मागेही घेतले आहेत. राज्याची जीवनदायीनी असलेल्या म्हादईचे अस्तित्व टिकविणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावर पर्यावरण, वन्यजीव आणि लोकांची उपजिविका टिकून आहे. केंद्रात काँग्रेस सरकार असताना म्हादईच्या विषयावर म्हादई जल तंटा लवादाची स्थापना केली. दिल्लीत जंतरमंतरवरही काँग्रेसने तेव्हा निदर्शने केली होती.

जागृती करणार-

डीपीआरला मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यास काँग्रेस आघाडीवर राहील. त्याशिवाय राज्यभर ‘म्हादई जागोर' ही जागृती मोहीम पुन्हा राबवेल. म्हादईच्या रक्षणासाठी ज्या संघटना, गट, व्यक्ती प्रयत्न करतील, त्यास पक्ष पाठिंबा देईल. भाजपने चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. म्हादईच्या प्रकरणावर राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. राज्यभर जागृती करण्यासाठी पक्षाने समितीही स्थापन केली आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT