Congress  Dainik Gomantak
गोवा

वाळपईत कॉंग्रेसपुढे बंड शमवण्याचे आव्हान

2017 साली पोटनिवडणुकीत राणेंनी भाजपतर्फे (BJP) लढत दहा हजार मतांची आघाडी घेऊन मोठा विजय प्राप्त केला होता.

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई मतदारसंघ हा विद्यमान आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राणेंना पराभवाची धूळ चारण्यासाठी धडपडणाऱ्या कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची सुंदोपसुंदी होऊन शेवटी उमेदवारीची माळ पहिल्याच महिला उमेदवार ठरलेल्या मनिषा उसगावकर यांच्या गळ्यात पडली. पण त्यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या रणजीत राणेसंह रोशन देसाई,विश्‍वेश प्रभू यांनी बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे. त्यामुळे कॉंग्रेसपुढे (Congress) हे कार्यकर्त्यांचे अंतर्गत बंड शमवण्याचे आव्हान आहे. (Congress Goa Assembly Election News)

मगोतर्फे विश्वेश प्रभू, आम आदमीतर्फे सत्यविजय नाईक, शिवसेनेतर्फे देविदास गावकर रिंगणात आहेत. तसेच आरजीचे मनोज परबही उतरतील, अशी शक्यता आहे. काँग्रेस पक्षात बरीच धुसफूस सुरु आहे. काँग्रेसमध्ये रणजीत राणे, रोशन देसाई, विश्वेश प्रभू, मनिषा उसगावकर ही चार नावे तिकिटीसाठी पक्षश्रेष्ठींकडे दिली होती. त्यात मनिषा उसगावकर यांना तिकीट दिल्यावर नाराज झालेल्या विश्वेश प्रभूंनी काँग्रेस सोडून मगोत उडी मारली अन् तिकीट मिळविले. तर रोशन देसाई, रणजीत राणे प्रचंड नाराज आहेत. रणजीत राणे यांनी तर आपण कोणत्याही परिस्थितीत उसगावकर यांना सहकार्य करणार नाही, अशी घोषणाच केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारात बरीच कमतरता दिसून आली आहे. या आव्हानांना तोंड देत उसगावकर यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.

2017 साली पोटनिवडणुकीत राणेंनी भाजपतर्फे (BJP) लढत दहा हजार मतांची आघाडी घेऊन मोठा विजय प्राप्त केला होता. परंतु नंतरच्या काळात मेळावली आंदोलन तसेच अल्वारा जमीन मालकी प्रश्‍नावरून झालेल्या आंदोलनांमुळे राणेंपुढे आव्हान निर्माण झाले आहे. राणेंना गतवेळची किमया याहीवेळी साधणे शक्य होणार का,की मताधिक्य घटणार, याची उत्सुकता मतदारांत आहे.

आम आदमी पक्षाने (AAP) देखील यावेळी बरीच संघटनात्मक शक्ती वापरली आहे. आपतर्फे उसगावचे उद्योजक सत्यविजय नाईक रिंगणात उतरले आहेत. मागील दोन निवडणुकांत नाईक यांनी भाजपतर्फे लढत दिली होती. राणेंनी भाजप प्रवेश केल्यावर सत्यविजय यांनी आपचा पर्याय स्वीकारला आहे. त्यांच्या कोपरा बैठकांना गर्दी असते. पण त्याचे मतांमध्ये रुपांतर होणार का, हे लवकरच कळेल.

मतदारसंघात रोजगार कळीचा मुद्दा

रोजगार हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. विद्यमान आमदार राणे यांच्यामुळे अनेक युवकांना नोकऱ्या (Jobs) मिळाल्या आहेत. ज्यांनी अर्ज केले पण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत,त्यापैकी कुणी विचारलेच तर 'तुमचे नाव वेटिंग लिस्टवर आहे' घाबरू नका, असे प्रचारावेळी सांगण्यात येते. निवडणुकीनंतर उर्वरित उमेदवारांनाही नोकऱ्या मिळतील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षित बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नोकर भरती प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते मात्र न्यायालयीन निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT