काँग्रेस प्रवक्ता ट्राजन डिमेलो यांची पक्षातून हकालपट्टी Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस प्रवक्ता ट्राजन डिमेलो यांची पक्षातून हकालपट्टी

काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish chodankar)आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी भाजपकडे फिक्सिंग केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी भाजपकडे फिक्सिंग केले असल्याचा गंभीर आरोप करणारे प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते ट्राजन डिमेलो यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी हा आदेश जारी केला. डिमेलो यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवायासाठी केंद्रीय निरीक्षक दिनेश गुंडू राव यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी या आदेशात म्हटले आहे

दरम्यान, ही कारवाई म्हणजे काँग्रेस वस्तुस्थितीला सामोरे जाण्यास भीत असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया डिमेलो यांनी व्यक्त केली. कुठलीही कारणे दाखवा नोटीस न देता, माझ्याकडून स्पष्टीकरण न घेता मला पक्षातून काढून कसे टाकू शकता असा प्रश्न त्यांनी केला. डिमेलो यांचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. दाखल केलेली पक्षांतरविरोधी अपात्रता याचीका ही निव्वळ देखावा आहे. काँग्रेसचे जिंकून आलेले आमदार दुसऱ्या पक्षांना पुरवून त्यावर पैसा करणे हे गोव्यातील काही काँग्रेस नेत्यांचा धंदा बनल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मायकल लोबो यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका न घेतल्याबद्दल डिमेलो यांनी काँग्रेस नेते पी. चिदंबरम याना दोष देताना अशा बोटचेप्या भूमिकेमुळेच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवू पाहत नाहीत असे त्यांनी म्हटले होते. या निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवावी असा प्रदेश समितीने ठराव घेतलेला असताना नेते युती होणार अशी घोषणा कसे करतात असा सवालही त्यांनी केला होता. यासंदर्भात डिमेलो याना विचारले असता मी काय खोटे बोललो असा सवाल त्यांनी केला. मी प्रत्येकवेळी खरे तेच बोललो आहे. 2017 साली माझ्यावर अशीच कारवाई करून पक्षातून हाकलून लावले होते. पण नंतर मी सदस्यपदाचा अर्जही न भरता मला परत पक्षात घेतले गेले असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT