Nilesh Cabral and Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

सत्तेच्या अहंकारातून काब्रालांचं वक्तव्य, काँग्रेसचा निशाणा

मंत्री नीलेश काब्राल यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आक्रमक

दैनिक गोमन्तक

पणजी : गेले पंधरा दिवस सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झालेत. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस अशीच वाढेल असे संकेत पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले आहेत. महागाईवरून जनता होरपळत असताना आता राज्यात इंधन दरवाढीवरून राजकीय भडका उडाला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी दरवाढीवर प्रतिक्रिया देताना पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक वाहन वापरा असा सल्ला दिला. यावरून विरोधक आक्रमक झालेत. अशा प्रकारची विधाने सत्तेच्या अहंकारातून येतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. तर काब्राल यांचे वक्तव्य बेजबाबदार, असंवेदनशील, अपरिपक्व असून त्यांचे मानसिक संतुलन ढासळल्याची प्रतिक्रिया काँग्रेस (Congress) प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

दरवाढीमुळे कुटुंबियांचे बजेट बिघडले आहे, अशा जखमांवर ते मीठ चोळत आहेत. किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे प्राथमिक कर्तव्य भाजप (BJP) सरकारने सोडलेले दिसते. हे म्हणजे ‘जर तुम्हाला ब्रेड परवडत नसेल तर केक खा’ असे भाजपचे मंत्री गोवावासीयांना सांगत आहेत. ही वृत्ती सत्तेच्या अहंकारातून निर्माण झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT