BJP Vs Congress: गोवा विधानसभेचा निकल जाहीर होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान पक्षांना आणि नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांतर्फे सुरू आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमधील (Congress) कुरबूर दिवसागणिक नवे वळण घेत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, 'काँग्रेसचा त्यांच्या उमेदवारांवर अविश्वास असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांना लोकांचे लक्ष वळवण्यासाठी नाटके रचायला भाग पाडले जात आहे; गोवा काँग्रेस अध्यक्षांनी बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा ज्यांच्यावर आपले नियंत्रण नाही अशा उमेदवारांना वेठीस धरण्यावर भर देण्याची गरज आहे. जनतेच्या आशीर्वादाने भाजपच गोव्यात पुढील सरकार स्थापने करेल.'
मुख्यमंत्र्यांच्या (CM Pramod Sawant) या विधानावरून परत एकदा भाजपचा या निवडणुकीतील यशस्वी होण्याचा आत्मविश्वास दिसून आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.