Latest Goa News In Marathi | Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यात काँग्रेसची आंदोलने सुरू, परंतु युवक आघाडी गायब; कार्यकर्त्यांना बळ देण्याचा नेत्यांचा प्रयत्न

Goa Politics: गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पणजीतील आंदोलनकर्त्यांना जे मार्गदर्शन करून सहभाग नोंदविला तोही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करायची असतील तर ठाकरेंना असा सहभाग नोंदवावा लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Protest

पणजी: गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे स्वतः शनिवारच्या पणजीतील काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी प्रभारी सचिव अंजली निंबाळकर या सहभागी झाल्या होत्या. परंतु ठाकरेंचा सहभाग असाच आंदोलनात राहिला तर निश्चित पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देता येऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला युवकांचा आणि महिलांचा आंदोलनात सहभाग वाढविणे हे पक्षासमोर एक आव्हान असणार आहे.

राज्यात जमीन हडपप्रकरण, नोकरी विक्रीप्रकरण आणि आता सिद्दिकी उर्फ सुलेमान खान या कुविख्यात गुन्हेगाराचे कोठडीतून झालेले पलायन अशा बाबी राजकीय वातावरण तापवण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. जेवढ्या तीव्रतेने विरोधी पक्ष आंदोलन करतील तेवढ्याच गतीने सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीला हादरा बसणार आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्षाने आंदोलनाची जी ठिणगी पेटवली आहे, ती विझता कामा नये. प्रसंगी इंडिया आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, तृणमूल काँग्रेस, शिवसेना उबाठा गट अशांना घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. परंतु सध्या प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची हिम्मत दाखविली आहे, ती निश्चित कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणारी ठरू शकते.

गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पणजीतील आंदोलनकर्त्यांना जे मार्गदर्शन करून सहभाग नोंदविला तोही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करायची असतील तर ठाकरेंना असा सहभाग नोंदवावा लागेल. केवळ पणजीतच नाहीतर राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरात आंदोलन करून तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करायला हवे.

युवाध्यक्ष कुठे?

काँग्रेसने आंदोलने सुरू केली, परंतु युवकांची आघाडी त्यात सक्रिय दिसायला हवी होती, ती दिसत नाही. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुठे असतात, तेच पक्षाच्या नेत्यांना माहीत नाही. याशिवाय दुसऱ्या बाजूला प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजून कोणाची निवड झालेली नाही. बिना नाईक यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. प्रदेश महिला काँग्रेससाठी कणखरपणे, प्रसंगी रस्त्यावर उतरून परखडपणे बाजू मांडणारे नेतृत्व गरजेचे आहे. आंदोलनात युवक आणि महिलांचा समावेश अधिक असल्यास ती यशस्वी होतात, त्याचा विचार पक्षाला करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT