Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Goa Congress: भाजप सरकार भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे रुपांतर करत आहे, असा आरोप काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारार्थ गोव्याकडे पाठ फिरवली, असा आरोप होत असतानाच आज प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी खासदार सार्दिन यांचे कान टोचले आहेत.

'पक्षाचे ज्येष्ठ नेते दोन्ही उमेदवारांचा प्रचार करत आहेत; मात्र खासदार फ्रान्सिस सार्दिन हे आपल्या घरात बसून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा प्रचार करत आहेत', अशा शेलक्या शब्दांत त्यांनी प्रहार केला.

काँग्रेसचा प्रचार सुरू आहे, परंतु त्यात स्टार प्रचारक उतरलेले नाहीत. शिवाय काही नाराज नेते प्रचारापासून अलिप्त आहेत, अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यावर पाटकर यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले आहे.

आज काँग्रेस भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी पाटकर यांनी वरील विधान केले. यावेळी काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

याप्रसंगी एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

खेरा म्हणाले...

- भाजप सरकार आपल्या भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनींचे रूपांतर करत आहे.

- आम्ही पर्यावरण संतुलन आणि गोव्याची जैवविविधता आणि तिची ओळख यांचे संरक्षण करू.

- म्हादईचा विषय केंद्र, कर्नाटक व गोव्यात भाजप सरकार असताना का सोडविला नाही?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT