Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

भाजपने ओबीसींना परत एकदा डावलले - युरी आलेमाव

''भाजप सरकारच्या बेजबाबदारपणाने सरकारी तिजोरीतून लाखोंचा चुराडा''

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा सरकारने पंचायत निवडणूक 30 दिवसांनी पुढे ढकलावी अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केला होता. तो आज गुरुवारी खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे गोवा सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांनी गोवा सरकारवर हल्लाबोल केला.

आलेमाव पुढे बोलताना म्हणाले की, आता बस्स झाले. भाजप सरकारच्या बेजबाबदारपणाने आणि नाकर्तेपणाने न्यायालयीन लढाईंवर सरकारी तिजोरीतून लाखोंचा चुराडा झाला आहे. आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने पंचायत निवडणूका पुढे ढकलण्याची सरकारची याचिका फेटाळली. भाजपने ओबिसींना परत एकदा डावलले आहे. अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार युरी आलेमाव यांनी उच्च न्यायालयाने आज पंचायत निवडणुकांची मुदत ३० दिवसांनी वाढविण्याची सरकारची याचिका फेटाळल्यानंतर दिली.

भाजप सरकारने आरक्षणासाठी लागणारी ओबिसींची माहिती जाणीवपुर्वक वेळेत गोळा केली नाही. बहुजन समाजाला त्यांच्या लोकशाही हक्कांपासुन वंचित ठेवण्याच्या भाजपच्या धोरणांचीच ही कृती होती. गोव्यातील जनता भाजपच्या ह्या पापाला कदापी माफ करणार नाही. आणि आगामी निवडणुकीत भाजपभक्त उमेदवारांना योग्य धडा शिकवतील असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT