Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: करदात्यांची ‘स्मार्ट’ लूट; न्यायालयीन चौकशी करा!

काँग्रेस : 1140 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress पणजी शहरातील स्मार्ट सिटीचे काम निकृष्ट दर्जाचे करतानाच करदात्यांच्या पैशांची लूट होत आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सरचिटणीस विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि पणजी महिला गटाच्या अध्यक्ष लविनिया डिकॉस्ता आदी उपस्थित होते. यावेळी गोम्स म्हणाले की,

‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’च्या मंडळ सदस्यांचा या 1,140 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात सहभाग आहे. खुद्द पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटी''चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले आहे.

बाबूश मंत्री असल्याने ते या सरकारचा भाग आहेत. म्हणून जेव्हा सरकारने भ्रष्टाचार कबूल केला, तेव्हा संबंधितांवर एफआयआर नोंदवला पाहिजे, असे गोम्स म्हणाले.

थेट केंद्रातून हस्तक्षेप

आम्ही त्यांना ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात 50 प्रश्न विचारले होते. पण एकाही प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आम्ही नियंत्रक महालेखापरीक्षकांना विशेष लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ते करण्यास नकार दिला.

याचा अर्थ थेट केंद्रातील कोणीतरी हस्तक्षेप करत आहे. वार्षिक रिटर्न भरण्यात अयशस्वी होऊनही कंपनी रजिस्ट्रार या संचालक मंडळावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे, असे गोम्स म्हणाले.

पणजीत योग्य पद्धतीने काम झाले नसल्याने पावसाळ्यात दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे आम्ही कामाची पाहणी करण्यासाठी आणि शहरातील धोकादायक ठिकाणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पणजी शहर दर्शन’ नावाची सायकल रॅली आणि चालण्याची स्पर्धा सुरू करणार आहोत.

- विजय भिके, सरचिटणीस, कॉंग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT