Arrest Dainik gomantak
गोवा

Assagao Crime: बोगस कागदपत्रे वापरून भूखंड विकले! ‘एसआयटी’कडून दोघांना अटक; आणखी दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंद

Assagao land grabbing Case: पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हणजूण येथील फेलिक्स नोरोन्हा यांनी २०२२ साली जमीन हडपप्रकरणाची तक्रार म्हापसा पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गोव्यात अनेक प्रकरणे उघडकीस आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Assagao land grabbing Case

पणजी: आसगाव येथील सर्वे क्रमांक २३७/७ व २०६/१३ मधील ३,३९५ चौ. मी. जमिनीचे बोगस दस्तावेज तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने प्रदेश काँग्रेस समाज माध्यम अध्यक्ष दिव्यकुमार प्रतापराय खंडार (४४, प्रियोळ) व योगेश देविदास मांगर (४१, म्हार्दोळ) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हणजूण येथील फेलिक्स नोरोन्हा यांनी २०२२ साली जमीन हडपप्रकरणाची तक्रार म्हापसा पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गोव्यात अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे सरकारने एसआयटी स्थापन करून ही सर्व प्रकरणे वर्ग केली होती. एसआयटीने तपास केला असता संशयितांनी जमिनीचा बनावट दस्तावेज तयार करून भूखंड विकल्याचे उघड झाले.

आणखी दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंद

एसआयटीने या प्रकरणी भावेश विश्वनाथ सिरसाट, वोमय कुमार एच., सुदिन दत्ताराम नावेलकर, श्रृती सुदिन नावेलकर, लक्ष्मी दत्ताराम नावेलकर, सुशांत दत्ताराम नावेलकर, शुब्रा सुशांत नावेलकर, समीर दत्ताराम नावेलकर, ॲड. मॅटलॉक डिसोझा, ॲड. सुशांत धाऊसकर व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

प्रदेश काँग्रेस समाज माध्यम अध्यक्षाच्या अटकेमुळे काँग्रेसच्या खोट्या नैतिकतेचे व वास्तवाचे दर्शन झाले आहे. जमीन बळकावण्यासारखे गंभीर आरोप असताना, काँग्रेस नेत्यांनी त्याला पदावर ठेवले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना आता या प्रकरणात खुलासा करावा लागेल.
गिरिराज पै वेर्णेकर, प्रवक्ते, भाजप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT