Congress is a main opposition party in Goa says Goa Chief Minister Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

'काँगेस' हाच खरा आमचा विरोधक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून मी स्वतः जातीने याकडे लक्ष देत आहे. आणि याचमुळे 2022 मध्ये आम्हला जनाशीर्वाद मिळेल हे नक्की.असे सांगत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने तो विरोधकांना पॉलिटिकल स्टंट वाटतोय असा टोला लगावत त्यांनी विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. प्रत्येक काम आम्ही मार्गी लावतोय म्हणून आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. (Congress is a main opposition party in Goa says Goa Chief Minister Pramod Sawant)

मनोहर पर्रिकर Manohar Parrikar ) हे देशाचे आणि राज्याचे मोठे नेते होते त्यांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही.मात्र त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळे पक्ष आम्हाला घेरत आहेत मात्र लोक आमच्यासोबत आहेत . विरोधक खोटा प्रचार करतायत पण ते अयशस्वी होतील.आणि आमचा विजय होईल असे सांगतच आमची सर्वात मोठी विरोधक काँगेसच (Congress) असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे . ते म्हणतात काँग्रेस मी संपवली हे थोतांड खोटं आहे. उलट त्यांचे आमदार माझ्यावर विश्वास ठेवून सोबत आले असा हल्ला देखील त्यांनी काँगेससवर चढवला आहे.

त्याचबरोबर राज्याचं हित लक्षात घेऊनच मी काम केलं, मगो पार्टीसोबाबत युती हा केंद्रीय बोर्डाचा निर्णय त्यात मी काहीच नाही बोलणार नाही.असे सांगत राज्यातील युतीचा चेंडू त्यांनी दिल्ली दरबारी टोलवला आहे.

आप गोव्यात सांगत आहे कि सर्वांना सरकारी नोकऱ्या देऊ हे कस शक्य आहे याउलट आपने दिल्लीत किती नोकरऱ्या दिल्या असा सवाल प्रमोद सावंतांनी अरविंद केजरीवालांना विचारला आहे . खोटी आश्वासने देऊन आप विश्वासघात करत आहे मात्र मी खोटं बोलणार नाही हे नक्की.

फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत,त्यांच्या अनुभवाचा फायदा गोव्यात नक्की होईल गोव्यातील सारेजण आमच्या पाठीशी उभे राहतील. मुख्यमंत्री कोण हा निर्णय पक्षाचा मात्र मी काम कारतच राहणार असे स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

‘शिवसेनेने जे महाराष्ट्रात केलं ते इथे त्यांना जमणार नाही, सगळे एकत्र आले तरी विजयी आम्हीच होणार. शिवसेने एक बाहेरचा माणूस इथे बसवला आहे. तो रोज खोटे बोलतो पण जनतेने त्यांना याअधीच नाकारले आहे आणि पुन्हा तेच होईल असे देखील त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT