Congress protest in Goa 
गोवा

Goa: स्टॅन स्वामींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसचे आंदोलन

स्टॅन स्वामींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते पणजीतील (Goa) आझाद मैदानावर जमले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भीमा कोरेगाव प्रकरणात (Elgar Parishad Case) तुरुंगात असलेले आदिवासी कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचे मुंबई उच्च न्यायालयात जामीन सुनावणीपूर्वी काल सोमवारी निधन झाले. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा यासाठी 84वर्षीय स्टॅन स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानवाधिकारचे कार्यकर्ते स्वामी यांची हत्या झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. (Congress claims death of Fr Swamy as custodial killing to protest in Goa)

सध्या गोव्यातही (Goa) कॉग्रेस पक्षनेते आंदोलन करत आहे. स्टॅन स्वामींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते पणजीतील आझाद मैदानावर जमले आहे. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, आमदार अ‍ॅलेक्स रेजिनाल्ड, माजी मंत्री अलेक्स सिकिरा सहभागी आहेत.

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा काल सोमवारी मृत्यू झाला. ते 84 वर्षाचे होते. स्वामी अनेक आजारांनी ग्रस्त होते. गेल्या वर्षी त्याना कोविडची लागण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी ही माहिती दिली. काल स्टेन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टात सुरू होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान डॉ. डिसोझा यांनी त्याच्या निधनाची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Viral Video: सीटवरुन 'महाभारत'! बसमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'बायकांनी नवऱ्याचा राग...'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

SCROLL FOR NEXT