Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपविरोधात विरोधकांची मोट

काँग्रेससह आम आदमी पार्टीही भाजपच्या विरोधात उभी, गोवा फॉरवर्डचाही पाठिंबा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. 28 मार्चला सकाळी 11 वाजता डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. दुसरीकडे विरोधकांनीही आपल्या विरोधाची धार वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस आणि आप एकत्र विरोधी बाकावर बसणार असल्याने सत्ताधारी भाजपसमोर आता तगडं आव्हान उभं ठाकलं आहे.

गोव्याच्या राज्यपालांनी 29 आणि 30 मार्च रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेससह आप एकत्र येत रणनीती आखली जात आहे. यासंदर्भात झालेल्या विशेष बैठकीला काँग्रेस आणि आपचे (Aam Aadmi Party) आमदार उपस्थित होते. भाजपविरोधात लढण्यासाठी आप आणि काँग्रेस एकत्र आल्याचं बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि सांत आंद्रेचे रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर हे काही कारणांमुळे बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत. मात्र त्यांचाही या विरोधीगटाला पाठिंबा असून भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधक सज्ज असल्याचं कामत यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून (Congress) निश्चित करण्यात आलं असून मंगळवारी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिक्वेरा भाजपच्या उमेदवाराला आव्हान देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT