Crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: सोझा लोबो हल्लाप्रकरणी 9 संशयितांना सशर्त जामीन

बार्देशात राहण्यास मनाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mapusa Crime: म्हापसा अतिरिक्त सत्र जलदगती न्यायालयाने शुक्रवारी (ता. 17) सोझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरणातील 9 संशयितांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायालयाने या संशयितांना दर 15 दिवसांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्यास सांगितले असून, त्यांना बार्देश तालुक्यात राहण्यास मनाई केली आहे.

शुक्रवारी सुनावणी झाली, ज्यात न्यायाधीशांनी विजय प्रकाश, संतोष चंद्रहास, सोहेल राणा हुसैन, हेमंत कुमार जोशी ऊर्फ गिल, सत्यवान कोरगावकर, पुष्पेंद्र मीना, मोहम्मद सादीक ऊर्फ लिंबू, मल्लिंगराया पुजारी आणि किशोर साळवी या नऊ संशयितांना सोझा लोबो प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला.

व्यावसायिक राजीव अरोरा याने गुन्हेगारी कट रचून संशयित सुनील भोमकर याच्यासह 10 ते 15 जणांना सोबत घेऊन सोझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला करायला लावला होता. या संशयितांनी

फिर्यादीच्या मालमत्तेची तोडफोड केली आणि या सर्वांनी दगड, रिकाम्या बाटल्या, धातूचे पाईप यांसारख्या शस्त्रांनी बेकायदेशीरपणे रेस्टॉरंटस्थळी जमाव केला. तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या फोडल्या होत्या.

या हल्ल्यात रेस्टॉरंटमधील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. या तोडफोडीमुळे रेस्टॉरंटचे सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले होते.

संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

28 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजता कळंगुट येथील सोझा लोबो रेस्टॉरंटमध्ये हे हल्ला प्रकरण घडले होते. व्यावसायिक शत्रुत्वातून झालेल्या हल्लाप्रकरणी प्रथमदर्शनी पुरावे असल्याने म्हापसा न्यायालयाने यापूर्वीच एकूण 26 जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंसंच्या 141, 143, 144, 147, 148, 427, 326, 307, 120 (ब) व 149 अन्वये गुन्हा नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT