Zuarinagar Public Toilet Dainik Gomantak
गोवा

Zuarinagar: शौचालयांची दुरवस्था; उघड्यावर सांडपाणी, नळाचीही मोडतोड

Zuarinagar Public Toilets: या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: झुआरीनगर येथील वीज खात्याच्या कार्यालयाच्या फाटकासमोर असलेल्या सुलभ शौचालयांची पूर्णपणे दुर्दशा झाल्याने आसपासच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी करूनही काहीच हालचाल होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

एकीकडे केंद्र सरकार घरोघरी शौचालय बांधून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे असलेल्या सुलभ शौचालयांच्या देखभालीकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही. झुआरीनगरामध्ये ७ सुलभ शौचालये आहेत. त्यातील बहुतांश शौचालयांची दुर्दशा झाली आहे.

काही पर्याय नसल्याने आसपासचे रहिवासी नाइलाजास्तव त्या शौचालयांचा वापर करतात. यातील वीज खात्याच्या कार्यालयाच्या गेटसमोर असलेल्या सुलभ शौचालयाची बरीच दुर्दशा आली आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सांडपाणी वाहते उघड्यावर

मोडतोड झालेल्या शौचालयांचा वापर करण्यात येत नसल्याने त्यामध्ये कचरा जमा झाला आहे. तेथील टाक्यांची स्वच्छता न केल्याने दुर्गंधी पसरली असून सांडपाणी सुलभ शौचालयाच्या मागच्या बाजूने उघड्यावर वाहत आहे. येथील नळाचीही मोडतोड झाली आहे. तसेच तेथील पिंपात पावसाचे पाणी जमा होऊन डासांची उत्पत्ती होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT