Foreign Tourists Dainik Gomantak
गोवा

विदेशी नागरिकांना ‘सी फॉर्म’ची सक्ती

माहिती द्या : राज्यातील जागामालकांना पोलिसांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी: विदेशी नागरिकांना राहण्यास भाडेपट्टीवर जागा देणाऱ्यांनी त्यांचा ‘सी फॉर्म 24’ तासात भरून पोलिस खात्याच्या एफआरआरओ विभागात देण्याची सक्ती आहे. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस खात्याने दिला आहे. अनेक विदेशी गोव्यात वास्तव्य करतात मात्र त्याची माहिती दिली जात नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(Compulsory ‘C form’ to foreign nationals)

राज्यातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस, फ्लॅट मालक विदेशी नागरिकांना वास्तव्यासाठी जागा देतात त्यांनी कायद्यानुसार विदेशी नागरिकांची माहिती एफएफआरओ किंवा एफआरओ या विभागाकडे देणे गरजेचे आहे. ही माहिती देण्यासाठी पोलिस खात्याने ऑनलाईन सी फॉर्म उपलब्ध केले आहेत. या फॉर्मची प्रिंट काढून त्यावर स्वतःचे छायाचित्र लावून युजर आयडी देऊन अपलोड करता येतात त्यामुळे या पोलिस खात्याच्या विभागाकडे येण्याचीही गरज नाही, मात्र त्याचा उपयोग हॉटेल्स व गेस्ट हाऊस व्यवस्थापनाकडून केला जात नाही असे निदर्शनास आले आहे. राज्यात राहत असलेल्या विदेशी नागरिकांची माहिती एफएफआरओ विभागात असणे गरजेचे असल्याने ती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हॉटेल, गेस्ट हाऊसची तपासणी होणार..!

येत्या काही दिवसांनंतर राज्यातील हॉटेल्स तसेच गेस्ट हाऊसची अचानक तपासणी पोलिसांमार्फत केली जाईल. त्यावेळी सी फॉर्म न भरलेला विदेशी नागरिक आढळून आल्यास विदेशी नागरिक कायदा 1956 नुसार कलम 16 खाली व्यवस्थापन किंवा मालकावर कारवाई केली जाईल. ही कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी पोलिसांना सहाय्य करावे, असे आवाहन पोलिस खात्यातर्फे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT