Show Cause Notice Dainik Gomantak
गोवा

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Show Cause Notice: अ‍ॅड. सावियो ब्रागांझा यांनी मार्च महिन्यात शिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रार केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Show Cause Notice

शिक्षण संचालनालयाची परवानगी नसताना किंवा अनुदानित शाळा असतानाही पालकांकडून बेकायदा शुल्क आकारणी केल्याबद्दल कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

अनुदानित शाळांना कोणतेही शुल्क आकारता येत नाही, तरीही ते आकारत असतील तर ते बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी 'गोमन्तक 'शी बोलताना स्पष्ट केले.

अ‍ॅड. सावियो ब्रागांझा यांनी मार्च महिन्यात शिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करूनच ही कारवाईची पावले उचलली आहेत.

शिक्षण संचालनालयाला मुख्यमंत्र्यांकडून कारवाईस परवानगी मिळताच त्यांनी तत्काळ मुष्टिफंड शिक्षण संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सात दिवसांत स्पष्टीकरण द्या !

शिक्षण संचालनालयाने बजावलेल्या नोटिसीमध्ये मुष्टिफंड हायस्कूल, कुजिरा यांना बेकायदेशीरपणे शुल्क आकारणे/वसुली करणे/घेणे/आकारणे आणि पूर्वमंजुरीशिवाय असा निधी निर्माण केल्याबद्दल दाखवा नोटीस जारी केली आहे. डीओईने सांगितले की, शाळेने ७ दिवसांच्या आत उत्तर द्यायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मृत्यूनंतर 7 वर्षांनी आली पाडकाम नोटीस! प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी; न्यायालयाने GCZMA ला फटकारले

Panaji: पणजीतील 'हा' मार्ग अचानक बंद! वाहतूक वळवली; काय आहे कारण? पहा..

Football Match Fixing: फुटबॉल मॅचफिक्सिंग प्रकरण! आरोपपत्रात 14 खेळाडूंचा समावेश; GFA समितीची चौकशी अंतिम टप्प्यात

Mhaje Ghar: ‘माझे घर’साठी ‘पोस्ट फॅक्टो’ निर्णय अडचणीचा? पंजाबातील एका प्रकरणात ‘सुप्रीम’ निवाड्याची प्रशासन वर्तुळात चर्चा

Vagator Restaurant Fire: वागातोरमधील रेस्टॉरंटमध्ये 'फायर' ड्रामा! झुंबराला लागलेल्या आगीनं उडाली खळबळ; सुदैवाने जीवितहानी टळली VIDEO

SCROLL FOR NEXT