Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: 17.50 लाखांची अफरातफर! 20 दिवसानंतर मडगाव पालिकेच्‍या कारकुनाविरुद्ध पोलीस तक्रार

Margao Municipal Council: या कारकुनाच्‍या विरोधात तक्रार नोंदवावी की नाही यासाठी पालिकेने कायदेशीर सल्‍ला मागितला होता.

सुशांत कुंकळयेकर

Margao Municipal Council

फेस्‍ताच्‍या सोपो करातून आलेली 17.50 लाख रुपयांची रक्‍कम पालिकेच्‍या तिजोरीत न भरता 17.50 परस्‍पर आपल्‍या खात्‍यात जमा करण्‍याचा आरोप असलेला मडगाव पालिकेचा कनिष्‍ठ कारकून योगेश शेटकर याच्‍या विरोधात शेवटी मडगाव पालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरी आणि अफरातफरीच्‍या आरोपाखाली त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.

मडगाव पालिकेचे मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी आज मडगाव पोलिसात ही तक्रार दिली. शंखवाळकर यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी या बातमीला दुजोरा दिला. मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिराेडकर यांनीही ही गोष्‍ट मान्‍य केली. अफरातफर झालेली रक्‍कम त्‍वरित पालिका तिजोरीत जमा व्‍हावी ही एकमेव इच्‍छा असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

तब्‍बल 20 दिवसांच्‍या कालावधीनंतर मडगाव पालिकेकडून ही तक्रार नोंदविण्‍यात आली आहे. या कारकुनाच्‍या विरोधात तक्रार नोंदवावी की नाही यासाठी पालिकेने कायदेशीर सल्‍ला मागितला होता. हा कायदेशीर सल्‍ला दिल्‍यानंतर ही तक्रार नोंदविण्‍यात आली. मागचे काही दिवस ही तक्रार नोंदविण्‍यास चालढकल केली जात असल्‍यामुळे पालिकेवर स्‍थानिकांकडून टीका होऊ लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT